scorecardresearch

यंदा ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये अडकले १६० वाहनचालक; गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढ

नवी गेल्या वर्षी ४४ जणांवर  ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई करण्यात आली. तर २०२१-२२ मध्ये गेल्या वर्षीही निर्बंध असताना २७ मद्यपीचालकांवर कारवाई करण्यात आली होती

यंदा ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये अडकले १६० वाहनचालक; गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढ
प्रातिनिधिक छायाचिक्ष

इंग्रजी नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप म्हणून मद्य प्राशन करून मज्जा करणे हा ट्रेंड सर्वत्र होत आहे. नवी मुंबई सुद्धा याला अपवाद नाही. त्यामुळेच ३० डिसेंबरपासूनच पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त असतो. यात विशेषतः मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर त्यांचे विशेष लक्ष असते.

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे शुध्दीत करण्याचे आवाहन

नवी मुंबईत नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नाही. केवळ एक दिवस अगोदर खारघरमध्ये अंमलीपदार्थ प्रकरणी १६ विदेशी लोकांना अटक केली. यात १० पुरुष तर ६ महिला होत्या. या महिलांमध्ये १ घाना देशाची तर १ कँमरूल देशाची नागरिक आणि अन्य सर्व नायाझेरीयाचे नागरिक होते. त्यांच्या कडून १ कोटी ७० हजार रुपयांचे विविध अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या कारवाईने नवी मुंबई पोलिसांची सतर्कता समोर आली होती.तसेच ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान लावण्यात आलेल्या बंदोबस्तात १६ वाहतूक शाखेकडून केलेल्या कारवाईत विना हेल्मेट ४८९, सिटबेल्ट न लावलेले १३५, सिग्नल तोडणारे ६७, व इतर एक हजार ५२९ अशा एकूण २हजर २२० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यात तब्बल १६० जणांवर  ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई करण्यात आली.   

हेही वाचा- नवी मुंबोकडविरा रेल्वे स्थानकाला जोडणारा उड्डाणपूल नवीन वर्षात सुरू होणार; द्रोणागिरी नोडमधील अंतर कमी होणार

नवी गेल्या वर्षी ४४ जणांवर  ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई करण्यात आली. तर २०२१-२२ मध्ये गेल्या वर्षीही निर्बंध असताना २७ मद्यपीचालकांवर कारवाई करण्यात आली होती. तर  २०१८ -१९ मध्ये ३४० तर २०१८-१९ मध्ये ३५३ मद्यपी चालाकांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

तिरुपती काकडे ( पोलीस उपायुत वाहतूक विभाग) मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्याची संख्या यावेळी वाढली आहे. गत वर्षी करोना निर्बंधमुळे संख्या कमी असू शाकते. या कारवाई यापुढे सातत्याने सुरु राहणार आहेत.  शून्य मद्यपी चालक हेच ध्येय आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 18:25 IST

संबंधित बातम्या