बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

शहरात वाहनचालकांचा बेशिस्तपणा जागोजागी दिसत असून वाहतूक पोलिसांनी दिवाळीत हेल्मेटविना प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांवर एक विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती.

हेल्मेटविना प्रवास करणाऱ्या १२ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई; सोमवारपासून सिग्नल तोडणाऱ्यांवर पथकाचे लक्ष

नवी मुंबई : शहरात वाहनचालकांचा बेशिस्तपणा जागोजागी दिसत असून वाहतूक पोलिसांनी दिवाळीत हेल्मेटविना प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांवर एक विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती. यात सहप्रवाशालाही हेल्मेट नसल्यास दंड आकारला गेला. यात मागील अकरा दिवसांत १२ हजार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. सोमवारपासून सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट नसल्यास दुचाकीचालकांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून कावरवाई सुरूच राहणार आहे.

नवी मुंबईत शीव-पनवेल महामार्ग तसेच पामबीच रस्त्यासह अंतर्गत मुख्य रस्त्यांवर भरधाव दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात नियमानुसार हल्मेट सक्ती करीत ती चालकासह सहप्रवाशालाही बंधनकारक करण्यात आाली आहे. मात्र अनेकदा दुचाकीचालकच हेल्मेट घालत नाहीत तर सहप्रवाशी कसे घालणार? यामुळे वाहतूक विभाग उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशानुसार विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. यात ११ दिवसांत सुमारे १२ हजार हेल्मेटविना प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात हेल्मेट न घातलेले सहप्रवाशी अधिक होते.

याबाबत वाहतूक विभागाचे उपायुक्त  पुरषोत्तम कराड यांनी सांगितले की, दुचाकीवरून प्रवास करताना दोघांनीही हेल्मेट घालणे हे सक्तीचे आहे. परंतु दुचाकीचालक हेल्मेट घालतो. परंतु सहप्रवासी हेल्मेट घालत नाही. त्यालाही हेल्मेट स्क्तीचे आहे. हा नियम न पाळणाऱ्या दुचाकीचालकांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी दुचाकीवरून जाताना दोघांनीही हेल्मेट घालणे आवश्यक आहे. यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहेत.

सिग्नल तोडणाऱ्यांवर लक्ष

वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर सोमवारपासून विशेष कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे.

पनवेलमध्ये अधिक प्रमाण

१० नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत हेल्मेटविना प्रवास करणारे सर्वाािधक दुचाकीचालक हे पनवेल परिसरात आढळले. यात पनवेल शहरात १३५, तळोजात १०२ तर खारघरमध्ये ६४ कळंबोली ५९ व नवीन पनवेलमध्ये ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action unruly drivers ysh