दोन वेगवेगळ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीस शोधून पळवून नेणाऱ्या व्यक्ती वर कारवाई करण्यात आली आहे. सदर दोन्ही अल्पवयीन मुलीच्या अपहरण बाबत गुन्हे नोंद करण्यात आले होते. २५ सप्टेंबर २०२१ मध्ये कोपरखैरणे येथून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र तिचा ठावठिकाणा सापडत नसल्याने पालक चिंतेत होते. हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागा कडे वर्ग करण्यात आले. मात्र पोलिसांनी तपासात सातत्य राखल्याने हि युवती देवनार येथे असल्याची माहिती तांत्रिक तपासात पुढे येताच पोलीस पथकाने देवनार येथे जाऊन मुलीस ताब्यात घेतले. व संशयित आरोपी रुपेश कंठे याची चौकशी सुरु आहे. या मुलीस कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून रविवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कोण आहे तो निर्वस्त्र व्यक्ती?

दुसऱ्या प्रकरणात  तळोजा पोलीस ठाणे परिसरातून  येथून १२ तारखेला १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या मुलीचा शोध घेताना काही प्रत्यक्षदर्शी माहितीगार आणि तांत्रिक तपासात हि युवती  पेंढरगाव या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस पथकाने जाऊन तिची सोडवणूक केली . या प्रकरणी संजीव मुखिया याला ताब्यात घेतले. दोन्ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या आहेत.