वीस हजारांची वसुली

पालिकेच्या वाशी विभाग कार्यालयातर्फे बुधवारी वाशी परिसरातील फेरीवाले आणि दुकानांमध्ये प्लास्टिक पिशवी वापरविरोधी मोहीम राबविण्यात आली. यावेळी चार जणांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महाराष्ट्र अविघनटशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६ व महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचा नियम २००६ अन्वये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र मालाची विक्री करण्यासाठी दुकानदार आणि फेरीवाल्यांकडून त्यांचा सर्रास वापर केला जातो. महानगरपालिकेच्या वाशी विभाग कार्यालयातर्फे बुधवारी सेक्टर १५, १६ व ९मधील व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार विक्रत्यांकडे कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.