सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून नवीन तारीख जाहीर; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

नवी मुंबई : गेली ११ वर्षे उड्डाणाच्या अनेक तारखा जाहीर झालेल्या नवी मुंबई विमानतळावरील पहिल्या उड्डाणाची आता एक नवीन तारीख सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी जाहीर केली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या खीळ बसलेल्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून या विमानतळावरून पहिले मालवाहतूक विमानाचे उड्डाण डिसेंबर २०२४ अर्थात तीन वर्षांंनी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
CIDCO has extended Navi Mumbai Metro timings following passenger demand
प्रवाशांच्या मागणीनंतर सिडकोने नवी मुंबई मेट्रोची वेळ वाढवली
blow to airline
रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश

या विमानतळ उभारणीचा पहिला अंदाजित खर्च सात हजार कोटी रुपये होता. विमानतळ उभारणीला अनेक कारणांनी विलंब झाल्याने या प्रकल्पाचा खर्च केंद्रीय पर्यावरण मंजुरी मिळेपर्यंत १६ हजार कोटी रुपये होता. आता हा खर्च २४ हजार कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. याशिवाय यापूर्वी जीव्हीके समूह हे विमानतळ बांधणार होते पण ते आता अदानी समूहाकडून उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे सिडकोने साडेपाच मीटर उंचीचा भराव पूर्ण केला आहे त्यावर नवी मुंबई एअरपोर्ट कंपनी चार मीटरचा भराव करणार आहे.

नवी मुंबई विमानतळाची पहिली संकल्पना जुलै १९९७ मध्ये प्रत्यक्षात आली. सर्वप्रथम राष्ट्रीय विमानतळाचा विचार केला जात असताना मुंबई विमानतळावर वाढलेली प्रवाशी संख्या पाहता हा विमानतळाचा आराखडा राष्ट्रीयवरून आंतरराष्ट्रीयचा तयार करण्यात आला. जमीन संपादन, पर्यावरण परवानगी, विमान प्राधिकरण मंजुरी अशा अनेक करसती पूर्ण केल्यानंतर या विमानतळाच्या विकास आराखडय़ाला नोव्हेंबर २०१२ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंजुरी मिळाली. त्यानंतर या विमानतळाच्या कामाला गती आली. या विमानतळाच्या एकूण प्रकल्पासाठी दहा गावांना स्थलांतरित करण्यात आले असून त्यांच्यासाठी चांगला मोबदला देण्यात आला आहे.  दहा गावांच्या स्थलांतरावरुन सुरू झालेला वाद सध्या विवमानतळ नामकरणावर येऊन ठेपला आहे.

मागील अकरा वर्षांंत या विमानतळावरील पहिल्या उड्डाणाच्या आठ ते दहा तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. विमानतळावरू पहिल्या टप्प्यात प्रवाशी वाहतूक सुरू होणार नाही. त्याऐवजी मालवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्याला पहिले उड्डाण म्हणून पाहिले जाणार आहे. या विमानप्रून दीड लाख मेट्रिक टनाची मालवाहतूक देश विदेशात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एक लाख प्रत्यक्षात तर अडीच लाख अप्रत्यक्षात रोजगार निर्मिती होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी एक ट्विट करुन विमानतळाच्या पहिल्या उड्डाणाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे या भागातील बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. अशा प्रकारे तारीख जाहीर केल्यानंतर खासगी विकासकांनी विमानतळ सुरू होणार असे आपल्या जाहिरत करुन घरांचा दर देखील वाढविला आहे. विमानतळ उड्डाणाची तारीख सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी थेट डिसेंबर २०२४ जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अकरा वर्षांत दहा तारखा

  • अकरा वर्षांत पहिल्या उड्डाणाच्या आठ ते दहा तारखा जाहीर
  • पहिल्या टप्प्यात विमानतळावरून मालवाहतूक
  • एक लाख प्रत्यक्षात तर अडीच लाख अप्रत्यक्षात रोजगार निर्मिती.