ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघर येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकारमधले मंत्री उपस्थित होते. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं, असं अमित शाहा यांनी व्यक्त केलं.

अमित शाह म्हणाले, “कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आणि आकांशाविना सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानात सुद्धा लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो.”

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

हेही वाचा : “माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा…”, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून कृतज्ञता व्यक्त; म्हणाले, …

“लक्ष्मीची कृपा एका कुटुंबावर अनेक वर्षे राहते. एकाच कुटुंबात अनेक वीर एकानंतर एक जन्म घेतात. आणि वीर कुटुंब तयार होते. पण, समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत राहतो, हे पहिल्यांदाच पाहिले आहे. पहिल्यांदा नानासाहेब नंतर आप्पासाहेब आता सचिनभाऊ आणि त्यांचे दोन बंधू हे संस्कार पुढे नेत आहेत,” असं अमित शाह यांनी म्हटलं.

हेही वाचा : “जिवात जीव असेपर्यंत हे काम चालू ठेवेन”, आप्पासाहेब धर्माधिकारींनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केला निर्धार!

“आप्पासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचं काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं,” असे गौरोद्गार अमित शाहांनी काढले आहेत.

“आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण ही शाश्वत आहे. धर्म आणि मंत्रोच्चारांनी दिलेली शिकवण ही अल्पजीवी ठरत असते. दुसऱ्यांसाठी जगणारी माणसं या जगात कमी आहे,” असेही अमित शाह म्हणाले.