करंजा बंदरातून सोमवारी एक बोट ताब्यात घेतली होती. बोटीच्या १२ तासांच्या चौकशीनंतर ही बोट संशयित नसल्याचा दावा उरण पोलिसांनी केला आहे. मात्र आढळलेल्या अतिरिक्त ३५० लिटर डिझेल प्रकरणी अकबर इस्माईल शेख रा.मनिष मार्केट-मुंबई ला अटक करण्यात आली असल्याची उरण पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उरण : करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात

करंजा -उरण येथील बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयित मच्छीमार बोट आढळून आली होती.नाव,नंबर, कागदपत्रे नसल्याने ही संशयित मच्छीमार बोट सोमवारी उरण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली होती. यावेळी सीमाशुल्क, पोलिस, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.मालकाच्या एका हस्तकामार्फत बोटीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.या कागदपत्रांनुसार सहा सिलेंडरची ही साईसागर बोट सन १९८७ साली नायगाव वसई येथे बांधण्यात आली होती.त्यानंतर ती बोट श्रवण कुमार वासुदेव कनोजिया रा.शिवाजी नगर- गोवंडी यांना २०१७ मध्ये विकण्यात आली होती. या बोटींची येथील ससुनडॉक बंदरात नोंदणी करण्यात आली आहे.त्यानंतर बोट मोहन जभाजी वराळे रा.ससुनडॉक-मुंबई यांना भाड्याने देण्यात आली होती.

हेही वाचा >>> भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई! शस्त्रसाठा, स्फोटके आणि ३०० कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट पकडली

ही बोट नादुरुस्त झाल्याने करंजा येथील बंदरात दुरुस्तीसाठी आणण्यात आली होती.या बोटीचा वापर तस्करीच्या मार्गाने डिझेल विक्रीसाठी करण्यात येत असावा या संशयातून बोट चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली होती.कागदपत्राची तपासणी आणि इतर चौकशीनंतर या बोटीचे निर्दोषत्व सिध्द झाले आहे.मात्र बोटीत बेकायदेशीरपणे अतिरिक्त ३५० लिटर डिझेल आढळून आल्याप्रकरणी उरण तहसील पुरवठा अधिकारी सोमलिंगा बिराजदार यांच्या तक्रारीनंतर अकबर इस्माईल शेख रा.मनिष मार्केट-मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.- सुनील पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,उरण

बोटीच्या मालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे.– सुरेश बागूळगावे,मत्स्यव्यवसाय विभाग परवाना अधिकारी,उरण

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An accused arrested in the case of extra 350 liters of diesel in the boat amy
First published on: 27-09-2022 at 20:15 IST