An accused who sexually assaulted a five-year-old girl was arrested in Taloja police station limits in Navi Mumbai | Loksatta

नवी मुंबई : पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक; तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

आरोपी एसी दुरुस्त करुन जेव्हा लिफ्टमधून खाली आला तेव्हा त्याला समोर पाच वर्षीची मुलगी खेळताना दिसली. आजूबाजूला कोणीच नसल्याचे पाहून आरोपीने तिला लिफ्टमध्ये नेऊन अत्याचार केला.

नवी मुंबई : पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक; तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीतील एका घरात बंद पडलेला एसी दुरुस्त करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अख्तर हुसेन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा- नवी मुंबई :वाशी फिडरमधील तांत्रिक बिघाडामुळे कोपरखैरणेतील अनेक भागात अंधार; दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत

आरोपी उद्ववाहन दुरुस्तीचे काम करतो. बुधवारी सायंकाळी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीमधील एका सदनिकेतीलमधील एसी दुरुस्त करून आरोपी लिफ्टमधून खाली आला असता त्याला इमारतीच्या परिसरात पाच वर्षीय मुलगी खेळताना दिसली. आजूबाजूला कुणीच नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांने त्या मुलीला लिफ्टमध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी येताच उलटी करू लागल्याने तिची विचारपूस केली असता मुलीने सर्व घटना आईला सांगितली. आई वडीलांनी इमारती खाली येत आरोपीचा शोध घेतला तेव्हा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. पालकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने यापूर्वीही असा गुन्हा केला आहे का याचा तपास पोलीस घेत असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:23 IST
Next Story
नवी मुंबई महापालिकेचा गोवरच्या प्रभाव प्रतिबंधासाठी सर्वेक्षण, लसीकरणावर भर