ज्या गाड्यां चोरण्यास सोप्या आणि मागणी जास्त त्याच गाड्या चोरणार्या दोन जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून तब्बल १४ लाख ७० हजाराच्या २१ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात १० रिक्षा १० स्कुटर आणि एका मोटारसायकलचा समावेश आहे.

आलम रफिक खान आणि सलमान शेख असे अटक आरोपींची नावे आहेत. तारुण्यात नुकतील पाऊले ठेवलेल्या या युवकांनी पंचवीशीही ओलांडलेली नाही मात्र वाहन चोरीत निष्णात म्हणून गुन्हे क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या बाजारात एक्टिव्हा या स्कुटरला मागणी जास्त असल्याने या दुकलीने एक्टिव्हा स्कुटरचे कुलूप तोडून सुरू करण्यात प्राविण्य मिळवले व चोरीला सुरवात केली. सोबतच रिक्षाही चोरी करण्याचे कसब शिकून घेतले.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

हेही वाचा >>> पनवेल : धक्कादायक! जन्मदात्या आईने नवजात अर्भकाला शौचालयातून दिले फेकून, उलवे येथील घटना

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक रिक्शा चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना अभिलेखवरील गुन्हेगार आणि सीसीटीव्हीत चोरी करतानाचे आरोपी याची सांगड घालत असताना त्यांना आलम याची ओळख पटली. त्याचा मागोवा काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे, यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले. सदर पथकाने आरोपीचा मग काढत सुरवयीला आलम याला शिवाजी नगर गोवंडी येथून अटक केली. आलम याने दिलेल्या माहितीनुसार याच परिसरातील बाबर अहेमद गल्लीतून सलमान याला अटक केली. त्यांना अटक केल्यावर त्यांच्या कडून २१ गाड्या जप्त केल्या.

आरपीच्या अटकेने एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील आठ, कोपरखैरणे – ५ , समतानगर, मानखुर्द, बी के सी, गावदेवी, देवनार,डी एन ए नगर आणि टिळकनगर या ठिकाणाहून प्रत्येकी गुन्हे उकल झाली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अभिजित पानसरे यांनी दिली.