नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित ‘जागर २०२१’ व्याख्यानमालेत जंयतीच्या पूर्वसंध्येला चार तरुणांनी बाबासाहेबांच्या वाचन संस्कृतीचे समाज मनावरील परिणाम विषध करीत वाचनामुळेच आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे सांगत आम्ही वाचलो, तुम्हीही वाचा असे आवाहन केले.
या संवादात आयआरएस अधिकारी क्रांती खोब्रागडे, उद्योजक गौरव सोमवंशी, कोरा ऑनलाइन प्रश्नमंच प्रमुख प्रशांत ननावरे, ब्लॉगर गुणवंत सरपाते, दंतचिकित्सक डॉ. निशिगंधा दिवेकर यांनी आपले अनुभव कथन केले.
क्रांती खोब्रागडे यांनी आपल्याला लहानपणापासूनच वाचनाची सवय होती असे सांगत बाबासाहेबांचे वाचनप्रेम काय होत ते सांगितले. तसेच वाचन असेल तरच एखाद्या विषयावर आपण ठामपणे बोलू शकतो. त्यामुळे तुम्हला ज्या गोष्टीमध्ये रस असेल ती पुस्तके जरूर वाचा असे आवाहन केले.
उद्योजक, ब्लॉगर गौरव सोमवंशी यांनी आपल्या आयुष्यात वाचनाची सवय आणि त्यातून रोजगाराची संधी कशी उपलब्ध झाली याबाबत अनुभव सांगितले. आवडीच्या लेखकांची, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तक वाचण्यात आल्यानंतर व्यक्त होण्यासाठी ब्लॉग ही संकल्पना सुचली, असे सांगतिले.
डॉ . निशिगंधा दिवेकर यांनी वाचनाचे महत्त्व सांगताना घरातूनच वाचन सांस्कृतीचा वारसा कसा मिळाला याचे अनुभव सांगितले. डॉ. बाबासाहेब यांना समजून घ्यायचं असेल तर वाचन करावेच लागेल. पुतस्क वाचन हे पुढे आयुष्यभर साथ देणारे असून त्यातून प्रेरणा मिळते असे सांगितले.
ब्लॉगर गुणवंत सरपाते यांनी वाचनाने त्याचे आयुष्य कसे बदलले, वाचनाने व्यक्तिमत्त्व विकास कसा झाला, पुढे त्याचा आयुष्याच्या प्रगतीत किती फायदेशीर ठरले याची माहिती दिली. तर प्रशांत ननावरे यांनी दादर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५० हजार पुस्तकांचे घर बांधले आहे. नवी मुंबई महापालिकेनेदेखील नवी मुंबई शहरात या डॉ. बाबासाहेब स्मारकात पुस्तकांचे घर बांधले आहे असे सांगत वाचन हे केवळ पुस्तक नव्हेच तर ज्या व्यासपीठावरून माहिती उपलब्ध होईल तिथे वाचन करता आले पाहिजे. या नव्या पिढीचा पुस्तकांविषयी, वाचनाविषयी दृष्टिकोन सांगून अभिनव विचार मांडले असून ‘आम्ही वाचलो, तुम्ही वाचा’ हा संदेश दिला आहे.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!