महागडय़ा कार चोरी करणाऱ्या चौघांना अटक

वाहन चोरी करून अन्य प्रांतात विकणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

नवी मुंबई : वाहन चोरी करून अन्य प्रांतात विकणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली सर्व वाहने महागडी आहेत. यात आणखी वाहन चोरीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे लक्झुरियस वाहनांमध्ये असलेली सुरक्षा प्रणालीवर मात करून ही वाहने चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरीच्या वाहनांत फॉच्र्युनर, झायलो आदी कारचा समावेश आहे. वाहन चोरीप्रकरणी एकाला अटक केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arrested stealing expensive cars ysh

ताज्या बातम्या