scorecardresearch

Premium

एपीएमसीत राज्यातील नवीन बटाटा दाखल होण्यास सुरुवात

सातारा आणि पुण्यातील बटाटा आवक होण्यास सुरुवात झाली असून पुढील कलावधीत नवीन बटाटा हंगाम सुरू होणार आहे.

Arrival new potatoes Maharashtra started APMC
एपीएमसीत राज्यातील नवीन बटाटा दाखल होण्यास सुरुवात (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत जुना बटाटा अधिक असून आता राज्यातील नवीन बटाटा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सातारा आणि पुण्यातील बटाटा आवक होण्यास सुरुवात झाली असून पुढील कलावधीत नवीन बटाटा हंगाम सुरू होणार आहे.

कांदा बटाटा बाजार समितीत सद्यस्थितीत गुजरात, मध्यप्रदेश, युपी या परराज्यातुन जुन्या बटाट्याची आवक अधिक सुरू आहे. सप्टेंबरमध्ये नवीन बटाटा दाखल होतो. बाजारात महाराष्ट्रातील तळे गाव ,पुसेगाव, वाई, सातारा येथील बटाटा आवक सुरू होते.

pune viral video
Pune Video : फक्त पुणेकरच नाही तर पुण्यातील गाईसुद्धा पाळतात ट्रॅफिक नियम, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
questions canceled
हद्दच झाली! परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपरचे दहा प्रश्न रद्द
tax hike
शासन करवाढ स्थगितीचा सरसकट निर्णय घेणार?
Gokuls-meeting
गोकुळची सभा वादळी होण्याची चिन्हे; सभेआधी पोस्टर युद्ध रंगले

हेही वाचा… पनवेलमध्ये ४८ दिवसांत डेंग्यूचे १४८ तर मलेरियाचे ७९ रुग्ण

बुधवारी बाजारात बटाट्याच्या ५३ गाड्या दाखल झाल्या असून त्यापैकी २ गाड्या नवीन बटाटा दाखल झाला आहे. नवीन बटाटा हंगाम सुरू होताच जुन्या बटाटा दर कमी होण्यास सुरुवात होते. एपीएमसीत जुन्यापेक्षा नवीन बटाटा दर अधिक आहेत. जुना बटाटा प्रतिकिलो १३-१४रुपये तर नवीन बटाटा २०-२२रुपये दराने विक्री होत आहे.

नाशिक मधील बाजार बंदीने कांद्याची आवक रोडावली

नाशिक मधील कांदा व्यापाऱ्यांनी निर्यात शुल्क आणि विविध मागण्यांसाठी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नाशिक बाजारात कांद्याचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प असून त्याचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील पडत आहे. नेहमी बाजारात १००हुन अधिक गाड्या दाखल होतात.मात्र नाशिक मध्ये कांदा विक्री ठप्प आहे असल्याने एपीएमसीत ७१गाड्या दाखल झाल्या असून गणेशोत्सवामुळे ग्राहक रोडावले असून कांद्याचे दर मात्र १८-२४ रुपयांवर स्थिर आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arrival of new potatoes in maharashtra has started in apmc dvr

First published on: 20-09-2023 at 17:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×