scorecardresearch

पामबीच मार्गावरील वेगावर कॅमेऱ्यांचे लक्ष; महापालिका, वाहतूक पोलिसांच्या बैठक

पामबीच मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याने वारंवार अपघात होत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : पामबीच मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई किंवा स्पीड गन ठेवूनही हे अपघात होत असल्याने आता महापालिकेच्या वतीने या मार्गावर प्रमुख अपघात स्थळांवर अॅिटोमॅटिक हाय स्पीड डिटेक्शन असणारे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबतचे निर्देश पालिका आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत.
याद्वारे वाहनांच्या वेगमर्यादेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद अॅअटोमॅटिक पोलीस नियंत्रण कक्षामध्ये होऊन त्यांच्यावर ई चलनमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पामबीचवर ठिकठिकाणी बसविण्यात येत असलेल्या सीसीटीव्हींच्या माध्यमातून रेड लाइट व्हायलेशन तसेच नंबर प्लेट डिटेक्शन होणार असून असे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाणार आहे.
पामबीचवर अपघातात मृत्यूचे प्रमाणही अधिक नुकत्याच झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक विभागाने या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. मात्र महामार्ग असल्याने गतिरोधक बसवता येत नाहीत. त्यामुळे मागील आठवडय़ात झालेल्या अपघातानंतर रम्बलर तरी बसवा, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी केली होती. त्यानुसार पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाहतूक पोलिसांसमवेत एक विशेष बैठक घेतली.
महानगरपालिकेच्या वतीने याआधीच पामबीच मार्गावरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने आयआयटीमार्फत पाहणी करून सुचवण्यात आलेल्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पामबीचवर झालेल्या अपघाताच्या विविध कारणांचा विचार करताना चालकाचे वेगावर नियंत्रण सुटणे हे प्रामुख्याने निदर्शनास येत आहे. यामुळे आता या मार्गावर वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी अॅाटोमॅटिक हाय स्पीड डिटेक्शन असणारे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
धोक्याचे सूचना फलक
पामबीचवरील वेगमर्यादा, ती मर्यादा ओलांडल्यास त्यावरील दंडात्मक कारवाई तसेच अपघातप्रवण क्षेत्र अशी धोक्याची सूचना देणारे मराठी व इंग्रजी भाषेतील फलक सहज नजरेस पड़तील अशाप्रकारे ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वाहन वेग नियंत्रित करण्यासाठी रम्बलर बसविण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attention cameras speed palm beach route municipal traffic police meeting amy

ताज्या बातम्या