Premium

नवी मुंबई : मराठी पाटी प्रकरण मालमत्ता प्रदर्शन ठिकाणीही

बीएएनएमने मालमत्ता प्रदर्शन वाशीत भारवले असून आज त्याचे उद्धाटन पार पडले. मात्र याठिकाणी एकही विकासकाने मराठी पाटी लावली नव्हती. ही महिती महाराष्ट्र नावनिर्माण सेनेला लागताच येथील आंदोलक धडकले.

BANM property exhibition
नवी मुंबई : मराठी पाटी प्रकरण मालमत्ता प्रदर्शन ठिकाणीही

नवी मुंबई : बीएएनएमने मालमत्ता प्रदर्शन वाशीत भारवले असून आज त्याचे उद्धाटन पार पडले. मात्र याठिकाणी एकही विकासकाने मराठी पाटी लावली नव्हती. ही महिती महाराष्ट्र नावनिर्माण सेनेला लागताच येथील आंदोलक धडकले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने फार मोठे आंदोलन न करता विकासक आणि मनसे यांच्यातील चर्चेत मराठी पाट्या लावण्याचे आश्वासन देण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील सर्व खाजगी आस्थापना दुकाने आदींना पाट्या मराठीतूनच लावण्यात याव्या यासाठी मनपाने नोटीस पाठवल्या होत्या. मात्र तरीही मराठी पाट्या अनेक ठिकाणी न झळकल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी सरचिटणीस विनोद पाखरे, शहर संघटक इस्माईल शेख, सचिव व्यापारी सेना जोगेंद्र जयस्वाल, उपशाखा अध्यक्ष शिवकुमार केवट तसेच अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.

हेही वाचा – पनवेल : सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची एक लाख ४७ हजारांची फसवणूक

हेही वाचा – उरण : द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त

आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषाबाजी केली व मराठी पाट्या लावल्याशिवाय विद्युत रोषणाई सुरु न करण्याचा आग्रह धरला. यावेळी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी आंदोलकांना तंबी दिल्यावर विकासक आणि मनसे पदाधिकारी यांच्यात बोलाचाली झाल्या त्यात विकासकांनी लवकरात लवकर मराठी पाट्या लावण्यात येईल असे आश्वासन दिले व आंदोलन थांबले. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Banm property exhibition and no developer put up a marathi board here mns protestors visit ssb

First published on: 01-12-2023 at 21:07 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा