scorecardresearch

पनवेलच्या केळवणे गावात पाणी पुरवठा समितीच्या माजी अध्यक्षाला मारहाण

जलजीवन मिशन योजनेमधील गावकीची रक्कम परत देण्यावरुन काही ग्रामस्थांनी वाद निर्माण केला.

पनवेलच्या केळवणे गावात पाणी पुरवठा समितीच्या माजी अध्यक्षाला मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र / लोकसत्ता

पनवेल : तालुक्यातील केळवणे गावात रविवारी सकाळी ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशनच्या हिशोबावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसन भांडणात झाले. विलास ठाकूर हे गेली चार वर्षे गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे जलजीवन मिशन योजनेमधील गावकीची रक्कम परत देण्यावरुन काही ग्रामस्थांनी वाद निर्माण केला. या वादात विलास यांच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा प्रकाश शिवकर, विजय शिवकर, जयदास शिवकर, विनायक गावंड, समाधान ठाकूर, वासूदेव ठाकूर यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी प्रकाश यांनी मारहाणी दरम्यान विलास यांच्या हात व नाकावर वार केल्याने हे प्रकरण पोलीसांत गेले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या