पनवेलच्या केळवणे गावातील पाणी पुरवठा समितीच्या माजी अध्यक्षाला मारहाण | beating in former president water supply committee crime kelwane village panvel | Loksatta

पनवेलच्या केळवणे गावात पाणी पुरवठा समितीच्या माजी अध्यक्षाला मारहाण

जलजीवन मिशन योजनेमधील गावकीची रक्कम परत देण्यावरुन काही ग्रामस्थांनी वाद निर्माण केला.

पनवेलच्या केळवणे गावात पाणी पुरवठा समितीच्या माजी अध्यक्षाला मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र / लोकसत्ता

पनवेल : तालुक्यातील केळवणे गावात रविवारी सकाळी ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशनच्या हिशोबावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसन भांडणात झाले. विलास ठाकूर हे गेली चार वर्षे गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे जलजीवन मिशन योजनेमधील गावकीची रक्कम परत देण्यावरुन काही ग्रामस्थांनी वाद निर्माण केला. या वादात विलास यांच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा प्रकाश शिवकर, विजय शिवकर, जयदास शिवकर, विनायक गावंड, समाधान ठाकूर, वासूदेव ठाकूर यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी प्रकाश यांनी मारहाणी दरम्यान विलास यांच्या हात व नाकावर वार केल्याने हे प्रकरण पोलीसांत गेले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : उलवे नोड शहराला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे ….

संबंधित बातम्या

नवी मुंबई : एपीएमसीत पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त १२० प्रकारच्या डाळीवर “नमो सेल”!
‘विजय’ आणि ‘विराट’ एपीएमसीमध्ये दाखल, पार पडला लाँचिंग सोहळा
नवी मुंबई: पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात उरणच्या समस्यांचा पाऊस
एपीएमसी सभापतीसाठी रस्सीखेच सुरू; शिंदे गटाचे प्रभु पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीसंबंधी कागदपत्रे सादर करा!; केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
रायगडमध्ये युती-आघाडी जुळवताना कसरत; ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये प्रथमच जाहीर फाशी
कर्जे महाग!; रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्णाटक बँके’तून!