scorecardresearch

नवी मुंबई : सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या बेलापूरकडील भुयारी मार्ग अंधारात

या भुयारी मार्गात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अधिक वावर आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी भुयारी मार्गातील प्रकाशव्यवस्था सुव्यवस्थित करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नवी मुंबई : सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या बेलापूरकडील भुयारी मार्ग अंधारात
सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या बेलापूरकडील भुयारी मार्ग अंधारात

नवी मुंबईतील सर्वात वर्दळीचे स्टेशन म्हणजे सीवूड्स दारावे रेल्वेस्थानक याच रेल्वेस्थानक परिसरात ग्रॅंड सेन्ट्रल मॉल आहे. त्यामुळे या रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. तसेच याच परिसरात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वावर या स्थानकात अधिक असतो. परंतू याच स्थानकाच्या बेलापूरकडील दिशेला एक भुयारी मार्ग असून सीवूड्स स्थानक पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्यासाठी या मार्गाचा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून याचा अधिक वापर होतो .परंतू याठिकाणी भुयारी मार्गाच्या दोन्ही दिशेच्या प्रवेशद्वाराजवळ फक्त दिवाबत्तीची सोय आहे. परंतू इतर भागात पूर्णतः अंधार पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

हेह वाचा- नवी मुंबई : शिष्यवृत्ती योजनेत राष्ट्रीयकृत बँकेत खात्याची अट; पालकांसाठी ठरतेय डोकेदुखी

मागील काही दिवसापासून सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पुर्वेला उड्डाणपुलाखालील भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बसगाड्या उभ्या आहेत.या बसगाड्या रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गातच उभ्या आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकाकडे जायचे कसे असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व रेल्वेप्रवाशांना पडतो. तर दुसरीकडे भुयारी मार्गाचा वापर करावा तर हा मार्ग तरुणी ,विद्यार्थी,पालक यांना असुरक्षित वाटत आहे.याच भुयारी मार्गालगत बसगाड्यांचे ड्रायव्हर ठाण मांडून बसलेले असतात. ठिकाणी बसड्रायव्हर रस्त्यातच ठिय्या मांडून बसलेले असतात त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या महिला तसेच महाविद्यालयीन तरुणाई यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी स्थानक रहिवाशी करु लागले आहेत. याच भुयारी मार्गात दिवसा व संध्याकाळच्यावेळी अंधार असतो. त्यामुळे या अंधाऱ्या चिंचोळ्या असलेल्या भुयारी मार्गाऐवजी अनेक नागरीकही रेल्वेस्थानकाचा वापर करुन रेल्वेमार्ग ओलांडून पूर्व पश्चिमेला जातात.सीवूड्स रेल्वेस्थानकात सतत वाढत जाणारी गर्दी तसेच आजुबाजुला विविध बेघर व भिकारी यांच्यामुळे मुली व महिलांमध्ये असुरक्षितता वाटत असून सिडको प्रशासनाने याठिकाणच्या भुयारी मार्गातील प्रकाशव्यवस्था सुव्यवस्थित करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा- नवी मुंबईच्या सुशोभिकरणाला नवी झळाळी; भित्तीचित्रे, शिल्पाकृतींची होतेय डागडुजी

सीवूड्स पूर्व पश्चिम दिशेला जोडणारा बेलापूरच्या दिशेला असणारा भूयारी मार्ग नेहमी अंधारा त्यामुळे आमच्या पालकांसमवेत येताना आम्हाला व आमच्या पालकांनाही भिती वाटते. त्यामुळे सिडको प्रशासनाने कार्यवाही करुन सहकार्य करावे, अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थीनी नीरजा पाटील यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबईत डान्सबार नव्हे ऑर्केस्ट्रा बार चालवा – पोलीस आयुक्तांचे आदेश

सीवूड्स रेल्वेस्काच्या बेलापूर दिशेकडील भुयारी मार्गात प्रकाशव्यवस्था नसल्याने महिला, महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी याच्यासुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.सिडकोच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करण्यात येईल. व तात्काळ भुयारी मार्गात आवश्यक प्रकाशव्यवस्था करण्याबाबत संबंधित विभागाला सूचित करण्यात येईल, अशी माहिती सिडकोचे कार्यकारी अभियंता मिलींद रावराणे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 18:26 IST

संबंधित बातम्या