मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : पनवेल-शीव महामार्गावर दहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात रेनू चौधरी या महिलेचा मृत्यू झाला. मात्र अपघातस्थळी सीसीटीव्ही नसल्याने या अपघाताची उकल अद्याप झाली नाही. त्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांनी शहरात फलक लावत या अपघाताबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी ठाणा नाका येथे रेणू चौधरी या जखमी अवस्थेत आढळल्या होत्या. ठाणा नाका ते खांदेश्वार उड्डाणपूलदरम्यान हा अपघात झाला होता. कामोठे वसाहतीमध्ये रेणू राहात होत्या. दसऱ्याच्या दिवशी त्या पनवेलमध्ये कामानिमित्त आल्या होत्या. पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मात्र अपघात नेमका कसा व कोणाकडून झाला याची माहिती मिळू शकली नाही.

त्यामुळे तिच्या भावांनी

शहरात फलक लावले असून नागरिकांना व प्रवाशांना या अपघाताबाबत काही माहिती असल्यास कळविण्याची विनंती केली आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. शहरात आशा प्रकराचे फलक पहिल्यांदाच लावल्याने याबाबत चर्चा सुरू आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Billboards in the city to report accidents akp
First published on: 27-10-2021 at 00:24 IST