नवी मुंबईतील पामबीचवरील वाझिरणी चौक लगत सेवा रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन युवक जखमी झाले होते. या घटनेनंतर जवळूनच जाणारे ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांनी तातडीने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: जासई ते करळ राष्ट्रीय मार्गावर अंधार

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
dombivli, shivsena corporator, two arrested in dombivli
डोंबिवलीत शिवसेना नगरसेवकाच्या नावाने पैसे उकळणारे दोन जण अटकेत

शनिवारी रात्री बाराच्या सुमारास आपले काम आटोपून ऐरोलीचे भाजपा आमदार यांच्या गाड्यांचा ताफा बोनकोडेच्या दिशेला निघाला होता. सीउडपासून निघाल्यावर पामबीचवरील वाझिरणी चौक लगत सेवा रस्त्यावर दोन व्यक्ती रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. हे दृश्य नाईक यांच्याही नजरेस पडतात त्यांनी गाडी थांबवली. पडलेल्या युवकांच्या जवळ गेले असता दुचाकी अपघात झाल्याचे लक्षात आले त्या दोघांपैकी एक शुद्धीत होता. त्यानेच वळण घेताना अन्य एका दुचाकीने धडक दिल्याची माहिती दिली. दरम्यान नाईक यांच्या इशाऱ्यावरून ताफ्यातील एकाने रुग्णवाहिकेला पाचारण केले. नाईक यांनी इतरांच्या मदतीने दोन्ही युवकांना रुग्णवाहिकेत बसवले व मार्गस्थ झाले.

हेही वाचा- नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ सव्वा तासात, बेलापूर ते मांढवा वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन भिंगारदिवे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की या अपघातात प्रजापती नावाच्या युवकाचा एक हात फ्रॅक्चर झाला तर सावंत नावाचा युवक किरकोळ जखमी झाला आहे. आमदारांनी गाडी थांबवून अपघातग्रस्त जखमींना मदत केल्याची चर्चा समाज माध्यमातून जोरदार होत आहे.