scorecardresearch

Premium

भाजपाच्या महाविजयाचा नवी मुंबईत महाजल्लोष

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या प्रचंड महाविजयाचा महाजल्लोष आज नवी मुंबई भाजपाच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला.

BJP victory in election
भाजपाच्या महाविजयाचा नवी मुंबईत महाजल्लोष (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नवी मुंबई – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या प्रचंड महाविजयाचा महाजल्लोष आज नवी मुंबई भाजपाच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा झाला.

माजी खासदार संजीव नाईक, भाजपा आयटी सेलचे प्रमुख सतीश निकम, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष माधुरी सुतार, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेढकर, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष राजेश राय तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

maval lok sabha seat
पिंपरी : मावळच्या जागेवरून महायुतीत पेच? राष्ट्रवादीच्या आमदारांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचाही मावळवर दावा
breaking away from Congress
काँग्रेसमधून फुटल्याचे बक्षीस, पण अशोक चव्हाण राज्याच्या राजकारणाच्या चाकोरीबाहेर
ashok chavan resignation marathi news, devendra fadnavis marathi news, eknath shinde marathi news, ashok chavan devendra fadnavis marathi news,
शिंदे-फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यातील सौहार्द उघड!
bjp mla ganpat gaikwad fired at shinde group kalyan city chief mahesh gaikwad after dispute
उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार

हेही वाचा – दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक

‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ तसेच ‘जय श्रीराम’च्या घोषणा दुमदुमल्या. मिठाई एकमेकांना वाटून विजयाचा आनंद गोड करण्यात आला. वाद्यांच्या तालावर ठेका धरत यावेळी कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. भाजपाच्या महा विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी खासदार संजीव नाईक यांनी देशातील जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या देशाचा यापुढेही विकास व्हावा हाच कौल जनतेने या निवडणूक निकालामध्ये दिला असल्याचे सांगितले. यापुढेही भाजपाच्या विजयाची घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये मोठ्या फरकाने भाजपाचा विजय झाल्याचे सांगून पाच राज्यांची निवडणूक ही आगामी लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असेल असे भाकीत वर्तविण्यात आले होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विरोधकांना चारी मुंड्या चित केल्याचे म्हटले.

हेही वाचा – आज हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

केंद्रातील भाजपा सरकारने देशातील सर्वच राज्यांच्या विकासाला पाठबळ दिले आहे. सर्व घटकांसाठी कल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. ‘यह तो झाकी है…’ असे सांगत त्यांनी आगामी लोकसभेमध्येदेखील भाजपाचा विक्रमी विजय होईल. नवी मुंबई आणि ठाण्यातील निवडणुकांमध्येदेखील भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp victory in election celebration in navi mumbai ssb

First published on: 03-12-2023 at 20:33 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×