scorecardresearch

नवी मुंबई : ऐरोली येथील जैवविविधता केंद्रात बोटिंग सफर सुरू

ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटकांसाठी केंद्राला भेटी देण्याबरोबर खाडी क्षेत्रात दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाला पाहण्यासाठी बोटींग सफारी सुरू करण्यात आली आहे.

नवी मुंबई : ऐरोली येथील जैवविविधता केंद्रात बोटिंग सफर सुरू
ऐरोली येथील जैवविविधता केंद्रात बोटिंग सफर सुरू (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई शहर हे फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येत असून शहरातील खाडीकिनारी फ्लेमिंगोचे वास्तव्य वाढत आहे . फ्लेमिंगो पर्यटकांना पाहता यावे यासाठी ऐरोली पाठोपाठ बेलापूर येथेही फ्लेमिंग बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. बेलापूर येथील बोटिंग १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली होती . मात्र ऐरोली येथील बोटींग सफर प्रतीक्षेत होती. अखेर सोमवारपासून दिनांक १९ डिसेंबर पासून ही बोटिंग सफर सुरू करण्यात आलेली आहे.

हेही वाचा- ओटीपी क्रमांक शेअर केला नाही तरीही ऑनलाईन फसवणूक; ८४० रुपयांच्या कपड्यासाठी २० हजार रुपयांचा फटका

नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनार आणि जैवविविधता यांची महिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. थंडीची चाहूल लागताच फ्लेमिंगो शहरात स्थलांतर होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो शहरात स्थलांतरित होण्यासाठी विलंब झाला होता. नोव्हेंबर १५ नंतर शहरात फ्लेमिंगो दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऐरोली येथील केंद्रातील बोटींग सफर ही उशिराने सुरुवात झाली आहे. अखेर सोमवारपासून सुरू झाली. पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आगाऊ बुकिंग केली जात आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 19:10 IST

संबंधित बातम्या