उरण : पावसाळ्यात सुरुवातील मासेमारी बंदी आणि आवक कमी असल्याने बोंबीलचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे खवय्यांना एका नगाला १०० रुपये मोजावे लागत होते. मात्र १५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाल्यानंतर बोंबीलची आवक वाढली आहे. तसेच श्रावण महिना सुरू असल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे खवय्यांना एक नग ५ ते १० रुपयांना मिळत आहे. यामुळे खवय्यांची चंगळ होत आहे.
बोंबील मासा हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. खास करून या काळात माशांची मागणीही मोठी असते. मात्र हा काळ मासेमारी बंदीचा असल्याने बोंबीलचे दर चढे होते. नगाच्या आकारानुसार ही मासळी १०० रुपयांना मिळत होती. मात्र सध्या खोल समुद्रातील मासेमारी जोमाने सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे हे मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत.
त्यामुळे आवक वाढली आहे. मात्र सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे ही मासळी ५ ते १० रुपयांना एक नग अशी मिळत आहे. मासळीचा नवा हंगाम १५ ऑगस्ट पासून सुरू झाला आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे. यात बोंबील मासे मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. त्यात श्रावण महिना सुरू झाला असल्याने बोंबील स्वस्त झाले आहेत. आयतु कोळी, मासळी विक्रेत्या
