break fail the dumper two peoples seriously injured and eleven cars damaged shiv panvel road navi mumbai | Loksatta

डंपरचे ब्रेक फेल झाल्यामुळे २ जण गंभीर जखमी तर ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मुंबई पुणे मार्गिकेवर झालेल्या या अपघातानंतर डंपर चालक पळून गेला आहे, मात्र त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे.

डंपरचे ब्रेक फेल झाल्यामुळे २ जण गंभीर जखमी तर ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर भरधाव डंपर ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. यात कोणी मृत झाले नसले तरी तब्बल ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दोन जण अंत्यवस्थ आहेत. डंपर चालक पळून गेला आहे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.

रविवारी दुपारी साडेतीन पावणेचारच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर वाशी पथकर नाक्यानजीक एका डंपरचा (एमएच ४६ एएफ ६६९४) ब्रेक फेल झाला आणि या भरघाव डंपरने ११ पेक्षा अधिक गाड्यांना ठोस मारली. शेवटी खाडी आणि खाडी पुलाला लावण्यात आलेल्या सुरक्षा पत्र्याला धडकून डंपर थांबला. मात्र दुर्दैवाने याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराला ठोकर मारली त्यात दुचाकीवर बसलेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मनपा रुग्णालयात दाखल केले होते.  

मुंबई पुणे मार्गिकेवर झालेल्या या अपघातानंतर डंपर चालक पळून गेला आहे, मात्र त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात झाल्या नंतर मानखुर्द नजीक पर्यत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. संध्याकाळी साडे पाच नंतर वाहतूक पूर्ववत झाली. ५ गाड्या टोइंग गाडी वापरून बाजूला करण्यात आल्या तर काही धक्का मारून रस्त्याच्या कडेला करण्यात आल्या ७ गाड्यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अंदाजे पाच गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात एका दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाल्या आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास देशमुख यांनी दिली. 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी!; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

संबंधित बातम्या

कचऱ्याच्या वर्गीकरणाला गावठाणांचा थंड प्रतिसाद
नवी मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात परीक्षा
मुंबई वाशी मार्गावर १० लेनचा नवीन टोलनाका! मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे लक्ष
नवी मुंबई – दिवाळीच्या सलग सु्ट्ट्यांमुळे ट्रॅफिक जॅम ; मानखुर्द ते वाशी टोलनाका दरम्यान प्रचंड कोंडी
नवी मुंबई: डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयातील ‘संविधान विशेष’ दालन वाचक, अभ्यासकांसाठी उपयुक्त

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपूर्वी हटणार’; छत्रपती संभाजीराजे यांचे विधान
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: फडणवीसांची अमित शाहांशी फोनवरून चर्चा , नेमकं काय बोलणं झालं?
रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण
“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी
पिंपरीः चिंचवड गोळीबार प्रकरणात तीन आरोपी अटकेत