उरण : शासन व सिडकोच्या भूसंपदानाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनीला कोट्यवधींचा मोबदला मिळू लागला आहे. यातील हिस्सा बहिणींनाही मिळावा अशी मागणी बहिणीकडून केली जात आहे. मात्र अनेक भावाकडून बहिणीचा हा हक्क नाकारला जात आहे. त्यामुळे अनेक बहिणींनी आपल्या रक्ताच्या सख्ख्या भावा विरोधातच न्यायालयात दावे दाखल केले आहेत.याचा परिणाम रक्ताच्या नात्यातील भाऊबीजेच्या सणावर परिणाम झाला आहे. यातून अनेक बहीण व भावांचे रक्षा बंधन व भाऊबीजही बंद झाले आहेत.

हेही वाचा >>>उरणमध्ये रुग्णवाहिकेचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?

संपतीच्या वाट्यासाठी रक्ताची नाती तुटू लागली आहेत. उरण तालुक्यात आशा प्रकारच्या १ हजार ५०० हुन अधिकचे दावे न्यायालयात दाखल आहेत. या दाव्यांची सुनावणी सुरू असून बहिणी आणि भाऊ न्यायालयाच्या आवारात एकमेकांचे तोंड देखील पाहत नाहीत. सिडकोने नवी मुंबई शहराच्या विकासासाठी उरण,पनवेल व ठाणे बेलापूर पट्टीतील शेतकऱ्यांच्या जमिनी  १९८५- ८६ साली ५ रुपये प्रतिचौरस मीटर  इतक्या अल्प दराने संपादीत केल्या आहेत. या दराच्या विरोधात शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायालयाकडून शेतकऱ्यांना सिडकोकडून वेगवेगळ्या विभागातील जमिनींचे  वेगवेगळे वाढीव दर दिले जात आहेत. यामध्ये प्रतिचौरस मीटरचा दर ३०० रुपये ते १ हजार ७२५ रुपया पर्यन्त दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना १ कोटी पासून ते २५ कोटी पर्यंतच्या वाढीव दर मिळत आहेत.

हेही वाचा >>>नवी मुंबई: एपीएमसी बाजाराच्या आवारात कचऱ्याचे ढीग; महापालिकेचे दुर्लक्ष

शेकऱ्यांच्या वारसांना या रकमा त्यांच्या वडिलोपार्जित शेतीच्या बदल्यात मिळत आहेत. त्यामुळे त्यातील हिस्स्या  भावाप्रमाणे बहिणींना ही मिळावा अशी मागणी बहिणीकडून केली जात आहे. तर भावाकडून आम्ही देतो ते घ्या अशी भूमिका घेतली जात आहे. मात्र न्यायाने बहिणींना ही समान हिस्स्याचा वाटा असल्याने यातील अनेक बहिणींनी आपल्या भावांच्या विरोधात थेट न्यायालयातच दावे दाखल केले आहेत. या कोट्यवधी रुपयांच्या हिस्सा वाट्यामुळे अनेक बहीण भावांची नाती तुटली आहेत. व तुटण्याच्या मार्गावर आहेत. कोट्यवधी रुपयांसाठी रक्ताची नाती संपू लागली आहेत. यातील अनेक भाऊ बहिणी या वयाच्या शेवटच्या टप्यात आहेत. त्यांना केवल पैशासाठी रक्ताची नाती तोडायची नाहीत. मात्र मुलांच्या व पतीच्या दबावाखाली आशा प्रकारचे दावे दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे पैशासाठी नातेसंबंधात दुरावा निर्माण होत असल्याने कुटुंबवत्सल समाजाला ही घरघर लागू लागली आहे.