लोकसत्ता टीम

नवी मुंबई : खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवार, दि. १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने श्री-सदस्य आणि भाविक उपस्थित राहणार आहेत. या नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या श्री-सदस्य आणि भाविकांना नवी मुंबईमधील विविध ठिकाणांहून कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रामामार्फत मोठ्या प्रमाणात बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या सर्व बसेस दैनंदिन बस मार्गांवर धावणाऱ्या बसेसमधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

हेही वाचा : स्वारींच्या दर्शनासाठी शुक्रवार रात्रीपासून श्री-सदस्य खारघरमध्ये दाखल

त्यामुळे आज शनिवारी दुपारपासून ते रविवारी सकाळ सत्रातील व कार्यक्रम संपेपर्यंत परिवहनच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या बसेस अपुऱ्या पडणार आहेत. याचा परिणाम अशा मार्गांवर धावणाऱ्या बसेसच्या दैनंदिन वेळापत्रकावर होऊन, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे,अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागामार्फत देण्यात आली आहे.