scorecardresearch

नवी मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला पसंती

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी या मुहूर्ताच्या शुभप्रसंगी आज सर्वत्रच उत्साह पाहण्यास मिळाला.

नवी मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला पसंती
(फोटो: Indian Express )

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी या मुहूर्ताच्या शुभप्रसंगी आज सर्वत्रच उत्साह पाहण्यास मिळाला.बाजारजारपेठा गर्दीने सजल्या होत्या. दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीचे अलंकार, गृहपयोगी वस्तू, उपकरणे आणि वाहनांच्या खरेदीसाठी नागरीकांची लगबग असते. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहक प्रामुख्याने पसंती दिली आहे. सराफांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी देखील लगबग पहावयास मिळाली.

हेही वाचा >>>उरण मधील सार्वजनिक तलाव बनले कचराकुंड्या

मागील दोन वर्ष करोना नियमांच्या चौकटीतुन सण उत्सव साजरे करण्यात आले होते. तसेच या कालावधीत आर्थिक मंदी ही सुरू होती. त्यामुळे सण उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले होते. या दोन वर्षात सोने खरेदीला नागरिकांनी पाठ फिरवली होती. अक्षय तृतीया, दिवाळी, दसरा या मुहूर्तांवर आवर्जून सोने खरेदी केली जाते . यावेळी ७०% ते ८०% असे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात आली .विजयादशमी निमित्त दुपारी २ ते ३ या दरम्यान असलेल्या शुभ मुहूर्तावर नागरिकांनी खरेदीसाठी मोठा उत्साह दाखविला. त्यामुळे यावेळी दसऱ्याला सोने खरेदिला ग्राहकांनी उत्साह दाखविला आहे असे मत सराफा व्यापारी प्रकाश जैन यांनी व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या