नवी मुबंई: बाईक कार रॅलीद्वारे कर्करोगाची जनजागृती | Cancer awareness through bike car rally navi mumbai amy 95 | Loksatta

नवी मुबंई: बाईक कार रॅलीद्वारे कर्करोगाची जनजागृती

स्तनाचा कर्करोगाची योग्य वेळी तपासणी होऊन लवकर निदान झाल्यास योग्य उपचाराने त्याच्यावर मात करता येऊ शकते.

navi mumbai
बाईक कार रॅलीद्वारे कर्करोगाची जनजागृती

महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्याबाबत महिलांमध्ये जागरूकता यावी यादृष्टीने ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून वाशी उप प्रादेशिक कार्यालय व नवी मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कार व बाईक द्वारे पिंक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्तनाचा कर्करोगाची योग्य वेळी तपासणी होऊन लवकर निदान झाल्यास योग्य उपचाराने त्याच्यावर मात करता येऊ शकते. मात्र भारतात बऱ्याच भागात अशा आजाराला महिला सामाजिक दबावाला घाबरून त्याचे तपासणी आणि निदान करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे या आजारावर उपचार करण्यास उशीर होतो. त्यामुळे यादृष्टीने कर्करोगाबाबत व्यापक प्रमाणावरजनजागृती होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने वाशी उप प्रादेशिक कार्यालय व नवी मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी नेरूळ आणि बेलापुर विभागात महिलांसाठी बाईक व कार द्वारे पिंक जन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत कर्करोग तसेच वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली.बया उपक्रमास हिरकणी,लेक माहेरचा कट्टा यासंह ऑपोलो हॉस्पिटलचे मोलाचे सहकार्य लाभले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 18:15 IST
Next Story
नवी मुंबई : अल्पवयीन मतिमंद मुलीचे अपहरण करून बलात्कार, दोन आरोपींना अटक