हवेतील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रदुषणातही भर पडत आहे. केंद्र सरकारने सन २०७० पर्यंत भारत देश कार्बन न्यूट्रल बनण्याचे ध्येय आखले आहे. तर मुंबई-उपनगरांनी २०५० पर्यंत शहर कार्बन न्यूट्रल ठेवण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने देखील खासगी संस्थेच्या माध्यमातून १५ दिसांपासून शहरातील कार्बन परीक्षण (ऑडिट) सुरू केले आहे. पुढील चार महिन्यात याबाबत महापालिकेला अहवाल प्राप्त होणे अपेक्षित आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिले आहे.

हेही वाचा- रायगड : जेएनपीएने तरुणांसाठी उद्योगावर आधारित प्रशिक्षण केंद्र उभारावे, सेझ जागर मेळाव्यात मागणी

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

कार्बन न्युट्रल बनण्याचे ध्येय, अधिक कार्बन क्रेडिट मिळविण्याकरिता सूक्ष्म नियोजन आखण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील कार्बन परीक्षण करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक खासगी संस्थेला हे काम ही देण्यात आलेले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या संस्थेच्या माध्यमातून शहरातील कार्बन निर्मिती परीक्षणाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. ही संस्था शहरात कोण-कोणत्या क्षेत्रातून किती कार्बन निर्मिती होते? याचा अभ्यास करून महापालिकेला ४ महिन्यात अहवाल सादर करणार आहे. यामध्ये औद्योगिक ,बांधकाम, सेवा आणि निवासी या क्षेत्रातून किती कार्बन निर्मिती होते ? याचे परीक्षण करून ही कार्बन निर्मिती कशी कमी करण्यात येईल याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे.

हेही वाचा- अमृत योजनेअंतर्गत प्रक्रियायुक्त पाणी विक्रीसाठी नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार

शहरातील कोणत्या ठिकाणी अधिक कार्बन फुटप्रिंट निर्माण होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कसे कमी करता येतील, शहर कार्बन न्यूट्रल कसे ठेवता येईल याबाबत नियोजन आखण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण पूरक असे शहरात हरित क्षेत्र अधिक वाढवणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, विद्युत वाहनांचा वापर करणे, दळणवळणासाठी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणे याव्यतिरिक्त कार्बन निर्मिती कमी करण्यासाठी आणखीन कोणत्या पद्धतीने नियोजन करता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे . शहराचे कार्बन ऑडिट करण्याचे नियोजन असताना देखील शहरातील दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता मात्र पुरती ढासळत आहे . नवी मुंबईतील दूषित हवेने मुंबईलाही पाठीमागे टाकले आहे. त्यामुळे महापालिकेने हे सुरू केलेले कार्बन परीक्षण आणि त्यावर उपयोजना शहराला कितपत फायदेशीर ठरणार ? हे पुढील कालावधीतच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा-

केंद्र सरकारने भारत देशाला २०७० पर्यंत कार्बन न्यूट्रल शहर बनण्याचे ध्येय ठेवले आहे. तर मुंबई उपनगरांनी २०५० पर्यंत कार्बन न्यूट्रल शहर करण्याचे नियोजन आखले आहे . त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने देखील १५ दिवसांपासून शहरातील कार्बन निर्मितीचे परीक्षण सुरू केले आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले असून ही संस्था ४ महिन्यात महापालिकेला याबाबत अहवाल सादर करणार आहे.
अभिजीत बांगर ,आयुक्त ( अतिरिक्त कार्यभार)नवी मुंबई महानगरपालिका