दोन दिवसांपूर्वी कामोठे पोलीस ठाण्यात दंत वैद्यकीय महाविद्यालयात शिकणा-या चार विद्यार्थ्यांविरोधात पोलीसांनी एका विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याने गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चारही विद्यार्थ्यांना नोटीस देऊन पोलीसांनी त्यांची बाजू मांडण्याची नैसर्गिक संधी दिली आहे. कामोठे येथील बड्या वैद्यकीय महाविद्यालयातील हे सर्व विद्यार्थी आहेत. जुलै महिन्यात विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची ही घटना घडल्याचे वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाच्या रॅगिंग प्रतिबंधक समितीसमोर निदर्शनास आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौकशीनंतर समितीने याबाबतची चौकशी केल्यावर खरंच रॅगिंग झाल्याचे उजेडात आले. महाविद्यालयाने केलेल्या चौकशीमध्ये चार इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्यांहून कनिष्ठ वर्गात शिकणा-या 19 वर्षीय विद्यार्थ्याला दारु पिण्यास भाग पाडले. तसेच दारु पिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला लघवी आल्याचे सांगीतल्यावर त्याला लघवी करण्यासाठी न जाण्याचा आग्रह केला. तसेच लघवी झालीच असेल तर पँटमध्येच कर असाही अट्टाहास धरला. सुरुवातीला या घटनेची वाच्यता पिडीत विद्यार्थ्याने केली नाही. मात्र काही दिवसांनी त्यांनी याबाबत पालकांना सांगीतले.

हेही वाचा : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कुल बसला खारघर येथे आग, बस चालक-मदतनीसाच्या प्रसंगावधानामुळे सर्व विद्यार्थी बचावले

पालकांनी महाविद्यालय प्रशासनाला याबाबत जाब विचारल्यावर महाविद्यालयाने हे प्रकरण रॅगिंग प्रतिबंध समितीसमोर चौकशीसाठी ठेवले. या चौकशीमध्ये संबंधित विद्यार्थी व त्याला छळणारे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये राहत होते. इमारतीमधील दुस-या सदनिकेमध्ये राहणा-या तीस-या वर्षाचे त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी छळ केल्याचे चौकशीत समोर आले. यावेळी पीडित तरुणाला लघवीला आली असता चार वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्याला लघवी करण्यापासून रोखत त्याला अधिक पाणी पिऊन लघवी रोखून धरण्यास सांगितले.

हेही वाचा : सायन पनवेल महामार्गावरील नवी मुंबई महापालिका हद्दीत एलईडीचा प्रकाश ; लवकरच देखभाल दुरुस्तीच्या कामाचा श्रीगणेशा

त्यानंतर छळणूक करणा-या जेष्ठ विद्यार्थ्यांनी त्या पीडीत विद्यार्थ्याकडे पॅन्टमध्येच लघवी करण्याचा आग्रह धरला. महाविद्यालयाने छळणूक करणा-या चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले असून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता जाधव यांनी महाविद्यालयाच्या अहवालानंतर तक्रार दाखल करुन संबंधित प्रकरणातील चारही विद्यार्थ्यांना नोटीस पाठविली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against four students at police station the case of ragging incidents at kamothe dental college in panvel tmb 01
First published on: 12-09-2022 at 14:59 IST