लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: विवाहानंतर पती, नणंद तसेच पतीची प्रीयसी यांच्याकडून जाच सहन न झाल्याने 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. कामोठे वसाहतीमध्ये ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात पती, नणंद आणि तीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी तपास सुरु केला असून या घटनेनंतर पती फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
aap protests on delhi road against arvind kejriwal s arrest
‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी

गुरुवारी दुपारी कामोठे वसाहतीमधील सेक्टर २२ येथील साईकृपा इमारतीमध्ये राहणारी एश्वर्या खोत या उच्चशिक्षित विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी वडिलांना फोन करुन आत्महत्या करत असल्याचे सांगीतले. वडीलांनी एश्वर्याच्या आईला या फोनची माहिती दिली. एश्वर्याच्या आईने एश्वर्याच्या पतीला मोबाईलवर संपर्क साधला. तो कामावर होता. पतीने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करुन घरचा पत्ता देऊन पत्नी एश्वर्याच्या घरी एकटीच असून संबंधित फोनवर आत्महत्येची माहिती दिली.

आणखी वाचा- २ दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात ४ अपहरण एका मुलीचाही समावेश, कोपरखैरणेतील घटना 

कामोठे पोलीस तातडीने एश्वर्याच्या साईकृपा इमारतीमध्ये पोहचले. घराचा दरवाजा न उघडल्याने पोलीसांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला मात्र तोपर्यंत एश्वर्याने वडिलांना सांगीतल्याप्रमाणे आत्महत्या केली होती. एश्वर्याच्या वडिलांनी कामोठे पोलीस ठाण्यात एश्वर्याच्या पतीविरोधात आणि ननंद आणि पतीच्या प्रियसीविरोधात मानसिक छळ आणि जाच केल्याची तक्रार केली आहे.

कंम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण झाल्यावर एश्वर्याचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता. माहेराहून सोने घेऊन ये, खोली घ्यायची आहे या कारणासाठी एश्वर्याचा मानसिक व शारीरीक छळ सुरु असल्याचे वडीलांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एश्वर्याची ननंद तिच्या पतीला भडकवत असे. पतीची प्रियसीने शिविगाळ केल्याने एश्वर्या मानसिक ताणात होती. त्यामुळे तीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत एश्वर्याच्या वडिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक संकेत कोठावळे हे तपास करीत आहेत.