शासनाच्या अनेक सवलती व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आदिवासींकडे दाखल्याची आवश्यकता असते मात्र ते उपलब्ध नसल्याने आदिवासी यापासून वंचीत राहत आहेत. यासाठी महसूल विभाग उरण यांच्या सहकार्याने उरण सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उरण मधील शेकडो आदिवासी मुलांना जातीच्या दाखले तयार करून त्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे येथील आदिवासीना याचा फायदा होणार आहे.

यामध्ये दुंबा ची कातकरी वाडी जासई, कोल्हापूर कातकरी वाडी चाणजे, लिंबाची कातकरी वाडी , डाउर नगर कातकरी वाडी उरण येथे सर्व कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला संतोष घरत जासई, रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, आदिवासी प्रतिनिधी मनीष कातकरी हे उपस्थित होते. जातीचें दाखले वाटप केल्यानंतर कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. उरण सामाजिक संस्थेचे आदिवासी लोकांसाठी केलेल्या मागील दोन वर्षाच्या कामाचे कौतुक कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी असे प्रामाणिक काम रायगड जिल्ह्यातील प्रत्येक वाडी वर होण्या करीता उरण सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व वाड्यांवर जातीचे दाखले काढण्याचे कॅम्प घेण्यासाठी विनंती केली असून तसे स्पष्ट आदेश सर्व उप विभागीय अधिकारी यांना दिलेले आहेत. प्रा राजेंद्र मढवी यांनी विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड, उप विभागीय अधिकारी श्री राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसीलदार उरण श्री भाऊसाहेब अंधारे आणि सर्व मंडळ अधिकारी,आदिवासी विकास निरीक्षक, तलाठी , महसूल विभागाचे उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांनी आभार मानले.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत