scorecardresearch

Premium

उरण: गुरुवार पासून जेएनपीटी जलसेवेत बदल; गेट वे ऑफ इंडिया ऐवजी लाँच भाऊच्या धक्क्याला लागणार

जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले असून गुरुवार (१ जून) पासून जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही पावसाळ्यातील पुढील चार महीने भाऊचा धक्का( फेरी वार्फ जेट्टी) येथून सुटणार आहेत.

Changes in JNPT water service from Thursday
गुरुवार पासून जेएनपीटी जलसेवेत बदल

उरण : जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले असून गुरुवार (१ जून) पासून जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही पावसाळ्यातील पुढील चार महीने भाऊचा धक्का( फेरी वार्फ जेट्टी) येथून सुटणार आहेत. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.

उरण मधील मोरा व जेएनपीटी या दोन्ही बंदरातून जलसेवा सुरू आहे. या दोन्ही सेवा बारमाही म्हणजे पावसाळ्यातही सुरू असतात. यातील मोरा ते मुंबई(भाऊचा धक्का) या सेवेचे पावसाळी तिकीट दर वाढविण्यात येतात. तर जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ही सेवा आठ महीने सुरू असते.ती पावसाळ्यात बदलून जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का या मार्गावर सुरू केली जाते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जेएनपीटी लाँच सेवा ही रात्री दहा ऐवजी ९ वाजता बंद केली जाते. या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीक ही प्रवास करीत आहेत.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Changes in jnpt water service from thursday amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×