नगरविकास आणि पर्यावरण विभागाच्या प्रमुख सचिवांना चौकशीसाठी निर्देश

नेरुळ येथील एनआरआय आणि टीएस चाणक्य या पाणथळ क्षेत्रावर गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए)ने सीआरझेड परवानगी विरुध्द ग्रीन्सनी केलेल्या तक्रारीला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास व पर्यावरण विभागाच्या प्रमुख सचिवांना या विषयावर चौकशीचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन विभाग व कांदळवन कक्ष ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य (टीएसएफएस) व्यवस्थापन आराखड्याचा एक भाग म्हणून सहा पाणथळ क्षेत्रांचे जतन करण्याचे नियोजन करत असताना, एमसीझेडएमएने या दोन्ही पाणथळ क्षेत्रांवर गोल्फ कोर्ससाठी सीआरझेड परवानगीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>>बंदी असतानाही पान टपरीवर सर्रास गुटखा विकणारा पकडला; लाखोंचा गुटखा जप्त

याबाबत पर्यावरणतज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे की सर्वोच्च न्यायालयात  कायदेशीर वाद अनिर्णित असून देखील एमसीझेडएमएने गोल्फ कोर्ससाठी ७ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सीआरझेड मंजूरीचे पुन:सत्यापन केले. मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१८मध्ये ३२ हेक्टरमध्ये पसरलेल्या तीन आझाद मैदानांच्या आकाराएवढ्या एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ क्षेत्रांवर नियोजन केलेल्या गोल्फ कोर्स प्रकल्पाला रद्द केले होते. याच्या विरोधात स्पेशल लीव्ह पेटिशन घेऊन सिडकोने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली, जिथे सुनावणी अजूनही बाकी असल्याची बाब, नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी निदर्शनास आणून दिली.

पुराच्या पाण्याला स्पंजाप्रमाणे शोषून घेणा-या पाणथळ क्षेत्रांवर भराव घालण्याच्या नियोजनाविरुध्द नॅटकनेक्टने केंद्र आणि मुख्यमंत्र्यांना नवीन तक्रार केली होती. या ईमेलला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाचे प्रमुख सचिव भूषण गगरानी आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख सचिव प्रविण दराडे यांना या प्रकरणामध्ये पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >>> देवगड हापुस नवी मुंबईत दाखल एपीएमसीत ३८ पेट्या दाखल

पाणथळ क्षेत्रांच्या उल्लंघनांविरुध्द केलेल्या ग्रीन्स समुहांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी राज्य पर्यावरण विभागाने बीएनएचएसचे माजी संचालक डॉ. दीपक आपटे यांच्या अध्यक्षपदाखाली नियुक्त केलेल्या विशेष समितीचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. तरीदेखील एमसीझेडएमएने गोल्फ कोर्सला हिरवा कंदिल दाखवला आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एनएमआयएएल)ने पर्यावरण प्रभाव परिक्षण (एन्विरोन्मेंट इंपॅक्ट असेसमेंट) अभ्यासाच्या आधारावर पर्यावरण मंजूरीचे विस्तारण मिळवले होते. या अभ्यासात  एनआरआय व टीएस चाणक्य पाणथळ स्थळांवरचे गोल्फ कोर्सचे नियोजन रद्द करण्यात आले असून या पाणथळ क्षेत्रांना स्थलांतर करणा-या पक्ष्यांचे गंतव्य स्थान म्हणून जतन केले पाहिजे अशी बीएनएचएसचे शिफारस केली होती.

सिडकोने आपल्या  याचिकेला मागे न घेता गोल्फ कोर्स नियोजन अजूनही आपल्या अजेंड्यावर ठेवले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाला, नवी मुंबई विमानतळाला दिलेली पर्यावरण मंजूरी रद्द करण्याची विनंती केली आहे.

पाणथळ क्षेत्रांना स्थलांतरीत आणि स्थानिक पक्ष्यांच्या रहिवासाच्या जागांच्या स्वरुपात जतन केले पाहिजे, नाहीतर हे उड्डाण करणारे पाहुणे आपली नेहमीची स्थाने न मिळण्याच्या स्थितीत विमानतळ क्षेत्रात अडथळा ठाण्याची  शक्यता आहे असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde order to to investigate golf course on wetlands matter zws
First published on: 02-02-2023 at 20:28 IST