पनवेल : सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका यांच्यातील असमन्वयाचा फटका सिडकोने बांधलेल्या महागृहनिर्माण योजनेतील सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या लाभार्थ्यांना इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्र दिल्याच्या तारखेपासून मालमत्ता कर आकारणी पालिकेने केली आहे. मात्र शेकडो लाभार्थ्यांनी सहा महिने व एक वर्षानंतर ताबा मिळाल्याने लाभार्थ्यांच्या खिशावर हजारो रुपयांचा भुर्दंड पडला आहे.

सिडको मंडळाने महागृहनिर्माण योजनेतील सदनिकांची सोडती काढून त्यानुसार लाभार्थ्यांची निवड केली. तसेच ज्या लाभार्थ्यांनी लवकर सदनिकेची रक्कम भरली त्यांना लवकर सदनिकेचा ताबा तर काहींना उशिराने सदनिकेचा ताबा दिला जातो. परंतू सदनिका धारकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यापासून मालमत्ता कर आकारणी पनवेल महानगरपालिकेकडून केली जात असल्यामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड विनाकारण सदनिका मालकांना सोसावा लागत आहे.

reliance Infra electric cars news
अनिल अंबानींची रिलायन्स ई-वाहनांच्या निर्मितीत उतरणार? २.५ लाख गाड्यांचं प्राथमिक लक्ष्य
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Dates for each police station to record statement of victims in POCSO
पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा
travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!
एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प
maharera issue model guidelines to regulate senior citizen housing projects
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत

हेही वाचा…नवी मुंबई : शहाबाज दुर्घटनाग्रस्त इमारतीचा विकासक व जागा मालक फरार ! एनआरआय पोलिसांचा शोध सुरु

सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ९५,००० परवडणारी घरे बांधण्याचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. यातील काही प्रकल्प हे नवी मुंबई तर काही प्रकल्प हे खारघर, तळोजा आणि कळंबोली या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात उभारण्याचे काम हाती घेतले. यापैकी हजारो सदनिकांचे बांधकाम सिडकोने पूर्ण केले. परंतू सदनिकेचा ताबा मिळण्यासाठी सिडकोकडून दिरंगाई झाल्याने नागरिकांना सिडको विरोधात मोर्चा काढण्याची वेळ आली. सध्या सिडकोचे हे लाभार्थी मालमत्ता करवसूलीच्या ओझ्याखाली अडकले आहेत.

महागृहनिर्माण योजनेतील खारघर येथील बागेश्री गृहसंकुलातील सदनिका धारकांना मे २०२४ मध्ये मालमत्ता कराचे देयके प्राप्त झाली. मात्र या गृहसंकुलातील सदनिकाधारकांना २८ जून २०२१ पासून सरसकट मालमत्ता कर आकारणी पनवेल पालिकेकडून करण्यात आली. यातील अनेक सदनिका धारकांना त्यांच्या घराचा ताबा सहा महिने तर काहींना वर्षभरानंतर मिळाला. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्रा नंतरचा आणि ताबा प्राप्त होण्याअगोदरच्या महिन्यांचा आणि वर्षांचा हजारो रुपयांचा मालमत्ता कर पनवेल महापालिकेने सदनिकाधारकांकडून वसूल करण्यासाठी त्यांच्या करदेयकात लावला आहे. तसेच संबंधित मालमत्ता कर न भरल्यास त्यावर दंड लावला जाणार आहे. त्यामुळे सिडकोच्या लाभार्थ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत असल्याची भावना सदनिकाधारकांची बनली आहे. महानगरपालिकेने करदेयकात ताबा मिळालेल्या तारखेनंतरचा कर आकारावा, करावर लावलेली शास्ती रद्द करावी आणि इमारत घसाराबाबतचा नियम लावून मालमत्ता कर आकारणी कमी करावी अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

हेही वाचा…खारघरमध्ये सराफाच्या दुकानात शिरुन लूट

विकासक या नात्याने ही घरे ताबा देण्यापूर्वी सिडकोकडे होती. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून ते ताबा देण्याच्या कालावधीतील मालमत्ता कर सिडकोने भरला पाहिजे. तसेच आम्हाला मालमत्ता कराची बिले ह्या वर्षी पहिल्यांदा देण्यात आलेली असल्याने शास्तीची रक्कम रद्द केली पाहिजे. आणि घसाराबाबत नियम लावून त्याचा लाभ आम्हाला महापालिकेने दिला पाहिजे. -संजय भोगले, लाभार्थी, बागेश्री गृहसंकुल, खारघर

हेही वाचा…Navi Mumbai Girl Murder : उरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; पोलीस म्हणाले, “२०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी…”

याबाबत पनवेल महापालिकेकडे काही निवेदने प्राप्त झालेली आहेत. सिडको मंडळाकडे आम्ही पत्रव्यवहार करून तो विषय मार्गी लावण्याबाबत सातत्याने प्रयत्नशील आहोत. शास्ती रद्द करणे तसेच घसारा लावून सूट देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. – बाबासाहेब राजळे, उपायुक्त (कर), पनवेल महानगरपालिका