सिडकोच्या भूखंडांना कुंपण घालणार

सिडकोचा सध्या भूखंड विक्रीचा धमाका सुरू असून या भूखंड विक्रीसाठी ग्राहकांना अनेक सुविद्या दिल्या जात आहेत.

हप्ते भरण्यास विलंब झाल्यास मुदतवाढ देणार

नवी मुंबई : सिडकोचा सध्या भूखंड विक्रीचा धमाका सुरू असून या भूखंड विक्रीसाठी ग्राहकांना अनेक सुविद्या दिल्या जात आहेत. यात या भूखंडांना जिओ टॅगिंग केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना भूखंडाचे निश्चित स्थान कळणे सोपे जाणार आहे. हे भूखंड विकत घेण्याची इच्छा असलेल्या अर्जदारांना काही कारणास्तव पहिला व दुसरा हप्ता भरता आला नाही तर त्यांना कमीत कमी तीन महिने व जास्तीत जास्त दहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सिडकोची आर्थिक स्थिती सध्या कमकुवत झाली आहे. ती सक्षम करण्यासाठी सिडकोने भूखंड विक्री सुरू केली असून गृहनिर्माण योजनेतील घरांचा ताबादेखील देण्यास प्राधान्य दिले आहे.

सिडकोच्या वतीने सातत्याने निवासी तसेच वाणिज्यिक संकुलाचे भूखंड विक्री केली जाते. गेली अनेक वर्षे मोकळे असलेल्या भूखंडावर अतिक्रमण वाढल्याने या भूखंडांना कुंपण घालण्याचे धोरणही सिडकोने राबविले आहे. कुंपण घातल्यावर त्या भूखंडाचा एकूण तपशील दर्शविणारा फलकदेखील दर्शनी ठिकाणी लावला जात आहे. यामुळे ग्राहकांना या भूखंडाचे निश्चित ठिकाण सीमा कळणार आहे. हे भूखंड घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना पहिला हप्ता भरण्यास काही आर्थिक अडचणी समोर आल्यास यथायोग्य प्रकरणात सिडको ग्राहकांना कमीत कमी तीन व जास्तीत जास्त दहा महिन्यांची मुदतवाढ देणार आहे. मात्र यासाठी लागणारा विलंब शुल्क भरावा लागणार आहे. ही मुदतवाढ दिल्यानंतरही ग्राहकांने उर्वरित पैसे भरून भूखंडाचा ताबा न घेतल्यास तो भूखंड रद्द केला जाणार असल्याचे सिडकोने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cidco plots will be fenced navi mumbai ssh

Next Story
उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
ताज्या बातम्या