घनकचरा व्यवस्थापनासाठी सिडकोची पालिकेला अंतिम मुदत

पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ द्या, महापौर निवडणूक झाल्यानंतर बघू, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पहिला प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन हस्तांतराचा मांडला जाईल अशा अनेक सबबी देऊन सिडकोच्या क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन हस्तांतरित करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पनवेल पालिकेला सिडकोने ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर एक दिवसही सिडको पनवेल पालिका क्षेत्रातील कचरा उचलणार नाही, असा निर्णय नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. या सेवेसाठी मनुष्यबळ, व्यवस्थापन प्रशिक्षण आणि निधी देण्याची तयारीही सिडकोने दर्शवली आहे.

canara bank declared may 15 as the record date for the stock split scheme
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Gang demanding extortion from municipal contractor arrested
महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारी टोळी अटकेत
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच

पनवेल महापालिकेची स्थापना २ ऑक्टोबर २०१६ला झाली. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रात असलेल्या सिडकोच्या खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या भागांतील सार्वजनिक सुविधा टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करून घ्याव्यात, असे पत्र सिडकोने पनवेल पालिका प्रशासनाला पाठवले होते. पालिकेने उत्पन्नाचे स्रोत  तात्काळ हस्तांतरित करून घेतले; मात्र घनकचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती, पाणीपुरवठा या खर्चीक सेवा हस्तांतरित करून घेण्यात टाळाटाळ केली. पाणीपुरवठय़ासारखी अत्यावश्यक सेवा हस्तांतरित करण्यासाठी सिडको आग्रही नाही; पण पालिका हद्दीतील दैनंदिन घनकचरा उचलण्याचे व त्याची विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेने त्वरित हस्तांतरित करून घ्यावे, असा आग्रह सिडकोने धरला आहे. त्यासाठी पालिका प्रशासन फारसे उत्सुक नाही. ही सेवा टाळता येईल तेवढी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आजवर विविध सबबी देण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या वेळकाढूपणामुळे सिडकोने १ जुलै रोजी पालिका क्षेत्रातील घनकचरा उचलणे बंद केले. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात दरुगधी पसरू लागली. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सिडकोने तीन दिवसानंतर पुन्हा हा घनकचरा उचलण्यास सुरुवात केली. त्या वेळी पुढील तीन महिने म्हणजे ३० सप्टेंबपर्यंत घनकचऱ्याचे व्यवस्थापन सिडको करणार आहे; मात्र त्यानंतर एक दिवसही सिडको या भागातील कचरा उचलणार नाही, असा इशारा सिडकोने पनवेल पालिकेला दिला आहे. त्यामुळे या सेवेचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याची तजवीज पालिकेने लवकर करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ही साफसफाई सिडकोच्या वतीने सुरू आहे, पण पालिका स्थापन झाल्याने ही सेवा कायम ठेवण्यास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

मनुष्यबळ, निधी देण्याची तयारी

घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेला आवश्यक मनुष्यबळ आणि प्रशिक्षण देण्याची तयारी सिडकोने दर्शवली आहे. या सेवेवर सिडको या भागात वर्षांला १६ ते २० कोटी रुपये खर्च करत आहे. पनवेल पालिकेला सध्या निधीचा चणचण आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशाने सिडको हा निधीही पनवेल पालिकेला देण्यास तयार असल्याचे समजते. सुमारे १५० किलोमीटर क्षेत्रफळाची साफसफाई या भागात येत असून त्यासाठी सध्या ६५० साफसफाई कामगार काम करीत आहेत.