scorecardresearch

Premium

नवी मुंबईचा दहावीचा ९५.१२ टक्के निकाल, यंदा १५ दिवस आधीच निकाल लागला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीचा निकाल आज शुक्रवार २ जून रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

result
नवी मुंबईचा दहावीचा ९५.१२ टक्के निकाल( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नवी मुंबई:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीचा निकाल आज शुक्रवार २ जून रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलांना मागे टाकत मुलींनीच बाजी मारली आहे.

नवी मुंबईतील १४१ शाळांमधून १५ हजार ५१८ परिक्षार्थींची नोंद झाली होती. त्यापैकी १५ हजा ४७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये १४ हजार ७२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नवी मुंबईचा ९५.१२ टक्के लागला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांनीही निकालात चुणूक दाखवली आहे. दोन वर्षांच्या करोना निर्बंधात ऑनलाईन आणि मागील वर्षी शालेय स्तरावर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदा मात्र करोनाची स्थिती नसल्याने १०० टक्के अभ्यासक्रमासह केंद्रानुसार परीक्षा घेण्यात आल्या होत्या. नुकताच २५ मे रोजी बारावीचा निकाल लागला असून यंदा पंधरा दिवस आधीच २ जूनला दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला आहे. पंधरा दिवस आधीच निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे नियोजन करणे सोयीचे ठरणार असून विद्यार्थ्यांना येत्या १७ जूननंतर त्यांच्या शाळेमधून निकालाची प्रत मिळणार आहे, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी दिली.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

हेही वाचा >>>नवी मुंबई : एपीएमसीत जुन्नर केशर आंबा दाखल

या शाळांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

यंदा नवी मुबंईतील बारावीच्या निकालात शंभर टक्के निकाल लागणाऱ्या शाळांमध्ये घट झाली होती, तर दहावीच्या निकालात शंभर टक्के निकालाची परंपरा शाळांनी कायम राखली आहे. यामध्ये वाशीतील सेंट मेरी हायस्कुल, फादर अ‍ॅग्नेल मल्टिपरपज स्कुल, माध्यमिक विद्यालय-सानपाडा, नेरुळ येथील सेंट झेवियर्स हायस्कुल व नुतन मराठी विद्यालय, डी.ए.व्ही पब्लिक स्कुल, एस.बी.ओ.ए.पब्लिक स्कुल, शारदा विद्या निकेतन, विद्याभवन माध्यमिक विद्याकय (इंग्रजी व मराठी), कोपरखैरणेचे साई होली फेथ स्कुल,स्वामी विवेकानंद हिंदी हायस्कुल सेक्टर-कोपरखैरणे,क्रिस्ट अ‍ॅकेडमी, इंद्रायणी इंटरनॅशनल स्कुल,स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कुल, घणसोलीतील न्यु बॉम्बे सीटी स्कुल व तिलक इंटरनॅशनल स्कुल, एस.एसहायस्कुल-सीवडुस, दिघा ईश्वरनगर येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कुल,न्यु मार्डन हायस्कुल-दिघा, ऐरोलीतील एस.आर.मेघे व श्रीराम विद्यालय तसेच नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक-१११ आणि सीबीडी सेक्टर-१४ येथील माध्यमिक विद्यालय या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Class 10 result was declared online navi mumbai amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×