स्वच्छ शहर राज्यात ४२ वा क्रमांक येऊनही उरण शहराची परिस्थितीत जैसे थे |clean city 42 rank in state but Garbage dirt in nagrparishad of uran | Loksatta

स्वच्छ शहर म्हणून राज्यात ४२ वा क्रमांक येऊनही उरणची परिस्थिती जैसे थे

मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती,नगरपालिका व महानगरपालिका यांच्यात राज्य व केंद्र सरकारकडून लाखो रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून लावून स्पर्धा भरवीत आहे.

स्वच्छ शहर म्हणून राज्यात ४२ वा क्रमांक येऊनही उरणची परिस्थिती जैसे थे

उरण : नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक आला आहे. मात्र उरणच्या रस्तोरस्ती आणि गल्लीतील एवढेच काय तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीही कचऱ्याच्या राशी दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छता अभियाना पुरतीच मर्यादीत मोहीम की पुढे ही सुरु राहणार असा सवाल आता उरणच्या नागरिकांकडून केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती,नगरपालिका व महानगरपालिका यांच्यात राज्य व केंद्र सरकारकडून लाखो रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून लावून स्पर्धा भरवीत आहे. त्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थान कडून जनतेच्या कर रूपातून जमा करण्यात आलेले लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

या स्पर्धा व मोहिमेचा भाग म्हणून शहरातील गल्लोगल्लीतील भिंती आकर्षक रंगाने रंगविल्या आहेत. त्यामुळे शहरातील सौन्दर्यात भर पडली आहे. मात्र अनेक वर्षे लाखो रुपये खर्च करून ही ज्या उद्देशाने या मोहिमा राबविल्या जात आहेत. ते सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्दिष्ट सफल झाले आहे का हा प्रश्न अनुत्तरितच आहे.उरण सारख्या छोट्या नगरपरिषदे नेही अनेक वर्षे स्वच्छता मोहीम राबविली. राज्य व जिल्हा पातळीवर पुरस्कार ही मिळविले. मात्र त्यानंतर ही शहराची कचरा समस्या कायम आहे.

हेही वाचा : पदभार स्वीकारताच आयुक्त राजेश नार्वेकरांनी घेतला विविध कामांचा आढावा

नुकताच उरण नगरपरिषदेला राज्यात मानांकन मिळाले असतानाही उरण शहरातील गल्लोगल्लीतील कचराकुंडीत कचरा कमी होतांना दिसत नाही. एकत्र तो वेळेवर उचला जात नाही,किंवा नागरिकांकडून बेशिस्त आणि कचरा गाडी येण्याची वेळ न पाळल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र काही असले तरी नगरपरिषदेने शहरातील कचरा वेळेत उचलुन कचरा कुंडी साफ होणे आवश्यक आहे. आणि हे काम केवळ स्पर्धा किंवा मोहिमेपुतरे मर्यादित राहू नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : मानवी कवटी आढळल्याने उडाली एकच खळबळ

संबंधित बातम्या

नवी मुंबईत शहर रंगरंगोटीसाठी करोडोंचा खर्च; पण महापौर बंगल्यासमोरील उद्यान नामफलक बघतोय रंगरंगोटीची वाट
चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”
नवी मुंबई: १० वीच्या सराव परीक्षेत ७० शाळा, दहा हजार विद्यार्थी सहभाग

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
अशा पळविल्या मोटारगाड्या…; साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे: पाणीटंचाईची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; स्थानिक स्वराज्य संस्थांना १३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश
राहुल, अय्यर, पंत एकाचवेळी खेळू शकतात? बांगलादेश दौऱ्याआधी माजी निवडसमिती सदस्याचे मोठे विधान
लाडक्या राहाला पहिल्यांदा भेटण्यासाठी तैमूर आतुर; ‘या’ दिवशी होणार भावा-बहिणीची भेट