पनवेल : खारघर वसाहतीमध्ये रस्त्यांवर बेकायदा फेरीवाले आणि फेरीवाल्यांविरोधात तक्रारी करणारे यांच्यातील संघर्ष खारघर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत शनिवारी तीन खंडणी व विनयभंगाच्या तक्रारी नोंदविल्या गेल्या. तसेच ज्याच्याविरोधात तक्रार नोंदविली गेली त्याने जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीची तक्रार या फेरीवाले व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांत दिली आहे. 

खारघर वसाहतीमधील लिटीलवर्ल्ड मॉलसमोरील गुरुप्रसाद हॉटेल समोरील रस्त्यावर कानबाली विकणारे फेरीवाले जावेद खर्शिद सय्यद यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार राकेश हरकुळकर, शाहीद शेख आणि संतोष चाळके यांना प्रतिदिन ५० रुपये व्यवसाय केल्यावर न दिल्यास या फेरीवाल्यांविरोधात पनवेल महापालिका आणि पोलिसांत फोटो पाठवून तक्रार करु अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या घटनेत राकेश हरकुळकर यांनी दिलेल्या तक्रारीत हरकुळकर हे अनुसूचित जमातीचे असल्याने त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी सात वाजता पांढऱ्या रंगाच्या फॉर्चुनर मोटारीतून आलेल्या दोन व्यक्तींसह कानातले विकणारा एका व्यक्ती, दोन महिला व इतरांनी येऊन त्यांना जातीवाचक शिवीगाळ व धमकावले. यातील काही व्यक्तींनी राकेशला मारहाण केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिसऱ्या घटनेत शनिवारी सायंकाळी लिटीलवर्ल्ड मॉलच्या समोरील रस्त्यावर कानातले विकणाऱ्या एका महिलेचा विनयभंग राकेश हरकुळकर यांनी केल्याची पोलिसांत संबंधित महिलेने तक्रार दिली आहे. राकेश हा पिडीतेचे पंधरा दिवसांपासून त्यांची परवानगी न घेता फोटो काढत असून त्या महिलेच्या मुलीकडे अश्लील नजरेने पाहत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. चौथ्या घटनेत डोसा विक्री करणारे सचिन इंगळे यांनी खारघर पोलीस ठाण्यात राकेश हरकुळकर, संतोष चाळके, शाहीद शेख व इतरांविरोधात तक्रार नोंदविली आहे.

Kalyan, Dombivli, army job fraud, Manpada police, fake appointment letters, youth scam, police investigation, kalyan news, thane news,
सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून डोंबिवली, कल्याणममधील भामट्यांकडून ४६ लाखाची फसवणूक
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
france, President Emmanuel Macron, National Assembly, lower house of parliament
विश्लेषण : फ्रान्समध्ये डाव्यांची मुसंडी, उजव्यांची घसरगुंडी… मतदारांचा अनपेक्षित कौल अस्थैर्य वाढवणारा?
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती
kalyan, Feeding Stray Dogs, Dog Loving Woman Threatened in kalyan, Dog Loving Woman Threatened with Death , Feeding Stray Dogs in kalyan, kalyan news, marathi news,
कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी
neet paper leaks cbi teams in bihar gujarat for combined investigation
‘नीट’ पेपरफुटीच्या तपासाला वेग; सीबीआयची पथके बिहार, गुजरातमध्ये; देशभरातील ५ गुन्ह्यांची एकत्रित चौकशी
Pune, Woman Beaten by Police Officer, rape case, Case Filed Against Nine, Case Filed Against Sub Inspector, pune news,
महिला कर्मचाऱ्याबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत आढळला; पोलिस अधिकाऱ्याची थेट शिपाई म्हणून पदानवती

हेही वाचा…पनवेल: तरणतलावाच्या प्रशिक्षकाकडून महिलेचा विनयभंग

सचिन यांचा डोसा विक्रीची गाडी सेक्टर २ येथील साईस्वर या इमारतीसमोरील रस्त्यावर आहे. संशयित राकेश हरकुळकर व इतर आरोपी आझार समाज पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांनी सचिन यांच्याकडून एप्रिल ते जून या महिन्यात सेक्टर २ येथील साईस्वर या इमारतीसमोरील रस्त्यावर डोसा विक्रीचा व्यवसाय करत असल्याने प्रति महिन्यासाठी १० हजार वसूल केले होते. दोन महिन्याचे वीस हजार रुपये घेतल्याने राकेश व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात २० हजार रुपयांची खंडणी वसूली केल्याचे म्हटले आहे.  

हेही वाचा…खालापूर पथकर नाक्यावर वाहनांच्या रांगा
 
नागरिकांचे महापालिका आयुक्तांच्या कार्यवाहीकडे लक्ष…  

खारघरमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास पनवेल महापालिका असमर्थ ठरल्याने खारघर महापालिकेच्या स्थापनेनंतरही फेरीवाला मुक्त होऊ शकली नाही. खारघरच्या निर्माणावेळी पोलिसांचा हात फेरीवाल्यांकडून हप्ते वसूली केली जात असल्याने पोलिसांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करावी लागली होती. महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांचा धाक फेरीवाल्यांवर राहिला नसल्याने वसाहतीमधील फेरीवाल्यांची संख्या शेकडोमध्ये आहे. शेकडो फेरीवाल्यांकडून वसूलीसाठी महापालिकेचे अधिकारी लाच प्रकरणात अडकू नये म्हणून वसूलीसाठी गुंड संस्कृती जन्माला आली. महापालिकेचे तत्कालिन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या कारकिर्दीत पनवेलमध्ये फेरीवाल्यांच्या हातगाड्या नष्ट करण्याचा सपाटा लावल्याने एकही बेकायदा हातगाडीवरुन शहरात व्यवसाय केला जात नव्हता. मात्र अवैध हफ्तावसूलीतून सर्वांचे खिशे गरम होत असल्याने महापालिका प्रशासनाचे प्रमुखांना फेरीवाल्यांमुळे शहर विदृप होते असे वाटत नसल्याने त्यांना फेरीवाल्यांविरोधात कारवाईत रस नाही. नवीन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या कारकिर्दीत फेरीवाला मुक्त सिडको वसाहती होणार का, असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. फेरीवाल्यांमुळे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केलेल्या दुकानदारांचा व्यवसाय तळाला गेला आहे. महापालिका या दुकानदारांकडून मालमत्ता कराची अपेक्षा करते. परंतू या दुकानदारांसमोरील फेरीवाल्यांचा प्रश्न महापालिका सोडविण्यास असमर्थ ठरली आहे.