मतदार छायाचित्र पडताळणी प्रक्रियेतही गोंधळ

पनवेल विधानसभा मतदारसंघात ५ लाख ६७ हजार मतदार आहेत.

४६ हजार ६६ मतदारांची नावे १२ वर्तमानपत्रांत विभागून प्रसिद्ध केल्याने शोध घेताना दमछाक

पनवेल : सध्या राज्यात मतदार यादी सुधारित करण्यात येत आहे. यासाठी ज्या मतदारांची नावे आहेत, पण छायाचित्रे नाहीत त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत. पण यासाठी त्यांनी शेवटची सात दिवसांची संधी देण्यात आली आहे. पनवेल विधानसभा मतदार संघात अशी ४६ हजार ६६ मतदारांची नावे आहेत. यासाठी पनवेलच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आधीच संभ्रमात असलेल्या मतदारांना आणखी संभ्रमात टाकले आहे. यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर नोटिसीचे ११ वेगवेगळे भाग करून ते विविध ११ वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात ५ लाख ६७ हजार मतदार आहेत. त्यापैकी ४६ हजार ६६ मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याने ही नावे का वगळू नयेत अशा आशयाची जाहीर नोटीस पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये जाहीर केली. ४६ हजार ६६ नावे एकाच वर्तमानपत्रात तातडीने जाहीर प्रसिद्ध करणे अशक्य असल्याने निवडणूक विभागातील काही अधिकाऱ्यांनी शक्कल लढवून विविध १२ वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र या नोटिसीमुळे सामान्य मतदारांमध्ये जागरूकता येण्याऐवजी त्यांच्या संभ्रमात भर पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २४ जुलैला दिलेल्या जाहीर नोटिसीमध्ये यादी क्रमांक १ ते १०८ यामधील नावे प्रसिद्ध करण्यात आली. तर त्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या दैनिकात १५७ ते २२७ आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दैनिकात २८८ पासून पुढील मतदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. एकाच जाहीर नोटिसीचे ११ तुकडे करीत त्याचे ११ भाग करण्यात आले. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. माझे नाव या यादीत नसेल ना म्हणून या मतदारांनी या वर्तमानपत्रांचा शोध घेतला. काहींना यादी मिळाली तर काहींना मिळालीच नाही. त्यामुळे समाजमाध्यमातून या प्रकारचा निषेध करण्यात आला. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ आधुनिक नसल्याने हा सर्व जाहिरात गोंधळ पनवेलमध्ये झाला आहे. त्यामुळे या प्रसिद्धीसाठी खर्च केलेले समुारे २० लाखही वाया गेले आहेत.

दोन दिवसांनंतर स्पष्टीकरण

ल्ल या सर्व गोंधळाच्या परिस्थितीवर नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्यानंतर पनवेलचे मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण समाजमाध्यमांवर प्रसिद्धीपत्रक काढून मंगळवारी दिले.

ल्ल पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५७० यादींमध्ये ४६०६६ मतदारांचे छायाचित्र नसल्याचे स्पष्ट झाले असून ज्यांचे छायाचित्र यादीमध्ये नाहीत अशांनी ३१ जुलैपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी, पनवेल तहसील कचेरीतील निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांना त्यांचे छायाचित्र जमा करावे, अन्यथा त्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.

ल्ल जाहीर नोटीस २४ व २५ जुलै रोजी विविध ११ दैनिकांमध्ये (वर्तमानपत्रांत) प्रसिद्ध करण्यात आली आहेत, तसेच नागरिक १ं्रॠं.िल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर भेट देऊ शकतील असेही स्पष्टीकरण दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Confusion voter photo verification process ssh