मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला उरण- पनवेल तालुक्यातील गावातून जोडणाऱ्या साई गावाजवळील रस्ता खड्ड्यात गेला आहे. या मार्गामुळे अलिबाग व गोव्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ३० किलोमीटरचे अंतर हे कमी होतो. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात साई खारपाडा मार्गाला खड्डे पडले होते. सध्या पावसाळा जवळ जवळ परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी या मार्गावरील साई येथील आर्शिया गोदामा जवळ खड्डे पडले आहेत.खड्ड्यातून लहान चारचाकी व दुचाकी वाहन चालविणे अवघड झाले आहे. पनवेल मार्गे कर्नाळा घाट टाळून ये-जा करणारी अनेक वाहने सध्या या मार्गाचा वापर करीत आहेत. मात्र याही मार्गात खड्डे असल्याने वाहन चालक व प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. इंधनाची बचत होण्याऐवजी खड्ड्यांमुळे अधिकचा वेळ जात असल्याची माहिती उरण मधील प्रवासी आशिष घरत यांनी दिली आहे. तसेच या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Connecting road to mumbai goa highway potholes in uran panvel taluka navi mumbai tmb 01
First published on: 24-10-2022 at 15:16 IST