महाराष्ट्र व कर्नाटक वाद विकोपाला जात असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सोलापूरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा केली असल्याने कर्नाटक व महाराष्ट्राचा वाद आणखी विकोपाला गेला आहे. तर दुसरीकडे भाजपचे आशिष शेलार यांनी कर्नाटकने ‘अरे’ केल्यास त्याला ‘कारे’ ने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. परंतू एकीकडे महाराष्ट्रातच नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानक परिसरात महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून कर्नाटक भवन दिमाखात उभे असून महाराष्ट्राच्या भूमीतच महाराष्ट्रभवन मात्र अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे नुसत्या राजकीय आरोप प्रत्यारोपात महाराष्ट्र भवनाची वीट कधी उभी राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा- उरणमध्ये सात फुटी जखमी अजगराला सर्पमित्रांकडून जीवदान

Gulab Barde, Maharashtra Kesari,
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
Increase in ST accidents 3 thousand 121 accidents in two months
‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१…
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची गाव कर्नाटकत घेण्याबाबतच्या वक्तव्यापासून हा महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद विकोपाला गेला आहे. मुंबईत नियोजित महाराष्ट्र भवनची वस्तू असावी, अशी लाखो महाराष्ट्रवासियांची इच्छा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटक भवन दिमाखात पण महाराष्ट्रात महाराष्ट्र भवन कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबईत महाराष्ट्र भवन कधी उभारणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. नवी मुंबईत महाराष्ट्रभवन सोडून कर्नाटक,राजस्थान,मध्यप्रदेश,आसाम,मेघालय,मिझोराम अशी महाराष्ट्रपेक्षा कितीतरी छोट्या असलेल्या राज्यांची भवन वाशी रेल्वस्थानक परिसरात आहेत. त्यामुळे इतर राज्यांचे भवन महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र भवन नसल्याबद्दल नवी मुंबईकरांमध्येही प्रचंड संतापाची भावना आहे. नवी मुंबई वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा गेली अनेक वर्षे रखडलेला प्रलंबित प्रश्न अद्याप कागदावरच आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार मंदा म्हात्रे यांची याबाबत बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र भवन उभारणीसाठी हिरवा कंदील दिला होता. महाराष्ट्र भवन हे राज्य सरकार उभारणार असून सिडकोने भवन निर्मितीसाठी भूखंड १रु दराने देण्याबाबत आमदार म्हात्रे यांनी मागणी केली होती.परंतू शासनाची सिडको संस्था असताना भूखंड देण्याबाबत अद्याप टाळाटाळ सुरु आहे. एमएमआरडीएने सिडकोला २६ कोटी रुपये दिले आहेत.पण महाराष्ट्र भवनची गाडी अद्याप कागदावरच आहे. शासनदरबारी कायम अनास्था पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा- एपीएमसी बाजारात ग्राहक रोडावल्याने कांद्याच्या दरात घसरण; किरकोळ बाजारात मात्र कांदा चढत्या दराने

नवी मुंबईत अनेक ग्रामीण भागातील तरुण विविध प्रकारच्या परीक्षा देण्यासाठी मुंबईत येत असतात, पण त्यांच्या निवाऱ्याची कोणतीही सोय नसताना अनेकदा मराठी तरुण तरुणी रात्री रस्त्यावर झोपलेले पाहायला मिळतात. दुसरीकडे याच नवी मुंबईत विविध राज्यांची भवने उभी आहेत.त्यामुळे आमच्या भूमीवर इतर राज्यांची भवन दिमाखात साकारली असताना आमच्याच महाराष्ट्राचे भवन अद्याप कागदावरच असल्याने नागरीक व तरुण वर्गात राग आहे. याबाबत मनसेसह विविध पक्षांनी आंदोलने उभारली. सिडकोच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. तर भूखंडावर महाराष्ट्रभवन फलक उभारला. परंतू महाराष्ट्रभवन निर्मितीची प्रश्न अद्याप अधांतरीच आहे..नवी मुंबई वाशी येथे सर्व राज्यांची भवने निर्मितीसाठी सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिले गेले असून त्यामध्ये “महाराष्ट्र भवन” उभारणीसाठीही ८ हजार चौरस मीटरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे.

वाशी येथे सेक्टर ३० अ येथे दोन एकरचा भूखंड राखीव असताना अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महाराष्ट्र भवन उभारणीकरिता महाविकास आघाडीच्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी १०० कोटींची निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतू भवनाचा प्रश्न कायम असून राजकीय आरोप प्रत्योरापांना मात्र जोर आल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने सदर भूखंड १ रु. नाममात्र दराने देण्याऐवजी सिडको हाच भूखंड विकून टाकेल अशी शक्यता राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे येत्या अधिवेशनात तरी याबाबत कायमस्वरुपी प्रश्न निकालात काढला जाणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. येणार असल्याने नवी मुंबईत सुसज्ज अशी महाराष्ट्र भवनाची वास्तू उभी राहणार असल्याचे चित्र आहे.

नवी मुंबईत देशातील विविध राज्यांची भवने दिमाखात उभी आहेत. परंतू ज्या राज्याच्या भूमीवर इतर राज्यांनी भवन उभारली परंतू महाराष्ट्र राज्याचे भवन नाही याची खंत होती. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रश्न मांडला होता.त्यांनीही राज्य सरकारच महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचे सांगीतले होते. एमएमआरडीएने सिडकोला २६ कोटी दिले असून येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.महाराष्ट्र भवन उभारणीचा प्रश्न मार्गी लावणारच.
मंदा म्हात्रे,आमदार ,बेलापूर

महाराष्ट्र भवन उभारणीची वीट महाराष्ट्र भाषा दिनापर्यंत न उभारल्यास मनेसच भूखंडावर वीट उभारणार….

महाराष्ट्रात इतर राज्यांची भवन दिमाखात उभी असून महाराष्ट्र भवन नसल्याबद्दल इतर राजकीय पक्षांना लाज वाटली पाहीजे. महाराष्ट्र भवनासाठी मनसेने अनेक आंदोलने केली. सिडकोभवनात घुसून आंदोलन केले. वाशीतील नियोजीत भूखंडावर मनसेनेच महाराष्ट्रभवन फलक लावला आहे. महाराष्ट्र भाषा दिन अर्थात २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनापर्यत महाराष्ट्रभवनाचे भूमीपुजन न केल्यास मनसेच तेथे आंदोलन करुन वीट उभारेल .
गजानन काळे, मनसे प्रवक्ता