नवी मुंबई : वाशी येथील एपीएमसी बाजारात वर्षभर परदेशी सफरचंद बाजारात दाखल होत असतात. जुलैअखेर देशी सफरचंद दाखल होण्यास सुरुवात होते. एपीएमसी फळ बाजारात शिमला, हिमाचल प्रदेशमधील सफरचंद तसेच हिमाचल प्रदेशातील पेर दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मात्र मुसळधार पावसामुळे त्या भागांतही रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेथून देशी सफरचंद दाखल होण्यास उशीर लागत आहे.

१५ ते २० ऑगस्टनंतर आवक वाढेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. सध्या परदेशी सफरचंदचा हंगाम सुरू असून १८-२० किलोला २००० ते ४५०० रुपये बाजारभाव आहे. देशी फळांच्या हंगामाला सुरुवात होताच वर्षभर सुरू असलेल्या परदेशी फळांची मागणी कमी होते.

आणखी वाचा-नवी मुंबईतही मालमत्ता करमाफी! शहरातील पाचशे चौरस फुटांपर्यंतची घरे असणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा

देशी सफरचंद ही भरीव, रसरशीत आणि चवीला गोड असल्याने अधिक मागणी असते, अशी महिती येथील घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली