scorecardresearch

नेरुळ विभागामध्ये कोट्यांवधीची वीजचोरी उघड करण्यात महिलांचे योगदान, २.३१ कोटींची विक्रमी वसुली

वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध नेरुळ विभागामध्ये मागील वर्षभरामध्ये सातत्याने वीजचोरी विरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहेत

electricity theft
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नवी मुंबई: तात्रिक फेरफार करीत वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध नेरुळ विभागामध्ये मागील वर्षभरामध्ये सातत्याने वीजचोरी विरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहेत. मागील एप्रिल -२०२२ ते जानेवारी- २०२३ पर्यंत नेरुळ विभागामध्ये वीजचोरीची एकुण ९० अशी एकुण ३९५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमधून महावितरणने एकूण २.३१ कोटी रुपयांची वसुली केलेली आहे व १९ वीज चोराविरुद्ध प्रकरणी एफआईआर दाखल केलेला आहे. जानेवारी अखेरपर्यंत तब्बल १३००० ग्राहकांची तपासणी करण्यात आली. 
 
वीजचोरी मोहीम ही नेरुळ विभागामध्ये कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे प्रत्येक महिन्यामध्ये घेतली जाते. यामध्ये उपविभागीय अधिकारी व सर्व अभियंते जनमित्र, लाईनस्टाफ व सुरक्षा रक्षक सुद्धा सामील होतात. विशेष म्हणजे विभागामध्ये असलेल्या ९ महिला अभियंता या मोहिमेमध्ये भाग घेत असतात. वरील यशामध्ये या महिला अभियंत्याचा मोलाचा वाटा आहे.

वीजचोरीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेगा वीजचोरी पकड मोहीम राबविण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यअभियंता श्री. धनंजय औढेंकर यांनी दिलेल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार आखण्यात आलेल्या वीजचोरी मोहिमांना नेरुळ विभागात चांगले यश प्राप्त झाले आहे.

आणखी वाचा- एन.एम.एम.टी चे १० वी परीक्षार्थीकडे दुर्लक्ष, परीक्षा केंद्रावर फ्रिक्वेन्सी वाढवण्याची मागणी

सध्याचे कार्यरत मुख्य अभियंता सुनील काकडे यांनीसुद्धा वीजचोरी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ‘वीजचोरीची कीड एक सामाजिक समस्या असून ती समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. कितीही कृत्याकरून ग्राहकाने वीजचोरी केली तरी महावितरण ती शोधून काढणारच. तेव्हा सर्व ग्राहकांनी अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे वीज वापर करावा व विजबिल वेळेत भरावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वीजचोरी विरुद्ध केलेल्या कारवाई मध्ये मिळालेल्या यशासाठी नेरुळ विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल. सुनील काकडे,  व अधीक्षक अभियंता, वाशी मंडळ, राजाराम  माने  यांनी अभिनंदन केले

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 19:04 IST