माजी नगरसेवक एमके मढवी यांना आज दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आज पासून दोन वर्षांच्या पर्यत त्यांना मुंबई मुंबई उपनगरे, रायगड  आणि ठाणे जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.रबाळे पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुंड  मनोहर कृष्णा मढवी यांचे गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या अनुषंगाने त्यांना हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव रबाळे पोलिसांनी सात जुलैला उपायुक्त कार्यालयात पाठवला होता.सदर अहवाला बाबत सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास टेळे यांच्या नेतुत्वाखाली करण्यात चौकशी  आली. प्राथमिक चौकशी करुन मनोहर कृष्णा (एमके) मढवी यांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभुमीवावत सर्व अभिलेख प्राप्त करुन प्रस्तावीत हद्दपार नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना बचावाची संधी हि देण्यात आली होती . या सर्व प्रकिया पार पाडल्यावर त्यांना हद्दपार आदेश देण्यात आले व आज त्याची अंमलबजावणी करण्यात आली. ठाणे, रायगड, मुंबई आणि मुंबई उपनगरे या ठिकाणाहून त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नवी मुंबई : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक कोंडी

सदर प्रकरणाची चौकशी सुरु असताना, दरम्यानच्या कालावधीत नमुद इसमाविरुध्द रबाळे पोलीस ठाणे येथे एक अडखापात्र गुन्हा ३० ऑगस्ट गणेश उत्सवा सारख्या संवेदनशिल काळात दंगल घडवून मारामारी केलेबाबत रबाळे येथे गुन्हा दाखल झाला होता. या शिवाय १९८७ पासून एकूण १८ दखलपात्र गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. एकंदरीत मनोहर मढवी यांचेविरुध्द सातत्याने दाखल झालेले गुन्हे त्यात गणपती उत्सवा सारख्या संवेदनशिल काळात दंगा घडविणे, मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खुन करणे, खंडणीसाठी धमकावणे, फसवणूक करणे व सार्वजनिक ठिकाणी मानवी जिवितास धोका निर्माण करणे या सारख्या गुन्हयांचा समावेश आहे. असेही पोलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> शुक्रवारी उरण मध्ये शतकी पावसाची नोंद

माजी नगरसेवक एमके मढवी यांना काही आठवड्यापूर्वी हद्दपार का करू नये? म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. हि  नोटीस एमके मढवी यांनी राजकीय षडयंत्र असल्याचा दावा करीत पोलीस उपयुक्त माजी विरोधापक्ष नेते माजी आमदार यांना या षडयंत्राचा सूत्रधार असल्याचा ससनाटी आरोप केला होता. अर्थात हे आरोप पोलीस उपायुक्त यांनी फेटाळून लावले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial former corporator manohar madhvi exiled amy
First published on: 08-10-2022 at 17:48 IST