नवी मुंबई शहरात करोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये झाला.त्यावेळी संपूर्ण शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.याच काळात सुरवातीला पालिकेच्या तोकड्या आरोग्यसुविधेचे चित्र समोर आले होते. त्यामुळे सक्षम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी करोनाकाळात पालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला. तब्बल करोना नियंत्रणासाठी २३० कोटींचा खर्च झाला. एकीकडे खाटा पावसात भिजल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर दुसरीकडे करोना काळजी केंद्रात रुग्णांच्या करमणुकीसाठी खरेदी केलेल्या एलईडीटीव्ही पालिका कार्यालय तसेच रुग्णालय, अग्निशमन केंद्र, विभाग कार्यालय पालिका अधिकारी यांच्या कार्यालयात लावण्यात येत आहेत.

हेही वाचा- टोमॅटोचे भाव झाले लालेलाल; एपीएमसी घाऊकमध्ये १० ते १५ रुपयांनी वाढ

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात करोना काळात पालिकेने १४ करोना काळजी केंद्र तयार केली त्याठिकाणी आरोग्यसुविधेसह करोना रुग्णांची मानसिक स्थिती सांभाळण्यासाठी करमणुकीसाठी टीव्हीसह वाचनासाठी काळजी केंद्रात पुस्तकेही ठेवण्यात आली होती. करोना रुग्णांना एलईडी टीव्हींसह अनेक साहित्याची खरेदी केली.करोनाकाळात तब्बल २३० कोटींचा खर्च झाला असून करोनाकाळात पालिकेने केलेल्या उपाययोजना राज्यातील इतर महापालिकांसाठी पथदर्शी ठरल्या परंतू आता याच काळात घेतलेले साहित्याचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा- कोपरखैरणेत नागरी आरोग्याचा बोजवारा; अडीच ते तीन लाख लोकसंख्येचा भार एकाच नागरी आरोग्य केंद्रावर

नवी मुंबई शहरात दोन वर्षापूर्वी मार्च २०२० मध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरवातीला पालिकेच्या वाशी रुग्णालयात करोना उपचार सुरु करण्यात आले होते.त्यानंतर करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्र येथे १२०० खाटांचे जम्बो करोना रुग्णालय सुरु केले होते. त्यानंतर शहरात विविध १४ ठिकाणी करोना काळजी केंद्र निर्माण केली होती. पहिल्या करोनाच्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट खूप मोठी होती.त्यामुळे एका दिवसात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले होते. तर उपाचाराधिन रुग्णांची संख्याही कित्येक पटीत वाढलेली होती.

हेही वाचा- पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

करोनाच्या या दोन्ही लाटेमध्ये पालिकेने मोठ्या प्रमाणात तात्पुरती भरती प्रक्रिया राबवली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोनाकाळातील ११ एप्रिल २०२१ ला ११,६०५ ही सर्वोच्च उपचाराधिन रुग्णसंख्या तर नवे रुग्ण १४००च्या पार झाले होते.करोना रुग्णांना विरंगुळा होण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या त्यामध्ये जवळजवळ ७५ मोठ्या एलईडीटीव्ही घेतल्या.आता करोनानंतर याच टीव्ही पालिका कार्यालयांमध्ये लावण्यात येत आहेत.

करोनाकाळात पालिकेची १३ करोना काळजी केंद्र, तसेच पालिकेची वाशी,नेरुळ,ऐरोली,बेलापूर,तुर्भे येथील रुग्णालये,तसेच २३ नागरी आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी पालिकेने आरोग्यसुविधा निर्माण केली. तसेच दुसरीकडे राज्यात सर्वात वेगाने लसीकरण मोहिम राबवणारी नवी मुंबई महापालिकाही राज्यात पहिली महापालिका ठरली.परंतू आता या टीव्ही पालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांची कार्यालये, अग्शिशमन केंद्र या ठिकाणी लावायला सुरवात केली असल्याची माहिती विद्युत विभागाचे अभियंता मिलींद पवार यांनी दिली.

हेही वाचा- श्वानाचे चित्रीकरण करणे पडलं महागात; थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल, वाचा नेमके काय झाले…

चौकट- २०२० पासूनचा खर्च
आरोग्य विभाग – १२० कोटी
शहर अभियंता विभाग- ६० कोटी
आपत्ती व्यवस्थापन -५० कोटी
एकूण अंदाजित खर्च -२३० कोटी

करोना काळातील साहित्याचा जास्तीत जास्त वापर करणार

करोनाकाळातील मोठ्या टिव्ही यांचाही वापर शहरातील विभाग अधिकारी कार्यालये, पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी,नागरी आरोग्य केंद्र यासह विविध ठिकाणी लावण्यात येत असून करोनाकाळातील कोणतीही वस्तू वाया जाणार नाही याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.