रुग्ण शंभर ते दीडशेच्या घरात

नवी मुंबई</strong> : रुग्णवाढ होऊ लागल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका पाहता शहरात पुन्हा काही आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. मात्र शहरातील दैनंदिन रुग्णांची संख्या ही शंभर ते दीडशेच्या घरात स्थिर आहे.

दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ही ५० पेक्षा कमी झाली होती. मात्र शहरातील निर्बंध उठविण्यात आल्यानंतर पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली होती. दररोज शंभर ते दीडशेच्या घरात रुग्ण सापडत होते. रुग्णवाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरात पुन्हा निर्बंध लागू केले. यात मॉल, सिनेमा व नाटय़गृह बंद करण्यात आली तर दुकानांच्या वेळांतही बदल करण्यात आला. सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली तर शनिवारी व रविवारी पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले.

निर्बंध लागू केल्यानंतर रुग्ण कमी होतील अशी अेपेक्षा होती, मात्र दैनंदिन करोना रुग्णसंख्या शंभरच्या दीडशेच्या घरात स्थिर आहे. शुक्रवारी नवी मुंबईत १०९ नवे रुग्ण आढळले तर दोन जणांचा मृत्यू झाला. करोनाबधितांची संख्या १,०१,८३० इतकी झाली असून मृतांची संख्या १७७४ झाली आहे. शुक्रवारी १२२ जण करोनामुक्त झाले असून १६२६ उपचाराधीन रुग्ण आहेत.

आठवडय़ातील रुग्णस्थिती

तारीख  रुग्ण   मृत्यू

१ जुलै  १४४    ३

२ जुलै  १३३    २

३ जुलै  १११    ५

४ जुलै  १४२    २

५ जुलै  ८३     २

६ जुलै  १०७    ३

७ जुलै  १५०    ४

८ जुलै  ११७    ५

९ जुलै  १०९    २