cough cold fever patients increased in navi mumbai city due to continuous change in climate zws 70 | Loksatta

सततच्या हवामान बदलामुळे शहरात सर्दी ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

वी मुंबई शहरात मागील काही दिवसात वातावरणात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे.

cough cold fever patients in navi mumbai
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात बाह्यरुग्ण दिवसाला ११०० वरुन १५०० पर्यंत वाढले.

नवी मुंबई-  मागील काही दिवसापासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे  चित्र आहे. कधी अचानक थंडीमध्ये वाढ होत आहे. तर मध्येच दोन दिवस पुन्हा गरम तर पुन्हा रात्रीच्या थंडीत होणारी वाढ यामुळे  सतत शहरात बदलत्या हवामानामुळे  आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात मध्यवर्ती असलेल्या वाशी पालिका रुग्णालयातही बाह्यरुग्णसेवेत वाढ झाल्याची माहिती पालिका रुग्णालयांच्या डॉक्टरांनी दिली  आहे.

नवी मुंबई शहरात मागील काही दिवसात वातावरणात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुले तसेच नागरीक यांच्या आजारी पडण्याच्या संख्येतही  वाढ झाली आहे.

बदलत्या वातावरणामुळे खासगी क्लिनिकबाहेरही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. वाशी येथील महापालिका रुग्णालयात असलेल्या बाह्य रुग्णविभागात दिवसाला सरासरी १ हजार ते ११०० पर्यंत बाह्यरुग्ण पाहायला मिळतात.परंतू सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे पालिका रुग्णालयातील संख्याही वाढू लागली आहे. मागील सोमवारपासून सातत्याने बाह्यरुग्ण संख्येत वाढ होत आहे.सकाळच्यावेळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात असून सातत्याने होणाऱ्या बदलामुळे डोकेदुखी तसेच ताप सर्दी तसेच खोकला वाढत आहे. सकाळी व सायंकाळच्यावेळी हवेत बदल होत असल्याने अचानक थंडीही जाणवत आहे,त्यामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे मत डॉक्टर व्यक्त करत आहेत.

पालिका रुग्णालयातील बाहयरुग्ण संख्या वाढली….

पालिका रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग असून या ठिकाणी सातत्याने रुग्णंची संख्या पाहायला मिळते. दिवसाला १ हजार ते ११०० रुग्ण आढळून येतात. परंतू शहरातील वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने असंतुलीत वातावरणामुळे रुग्ण आजारी पडण्याच्या संख्येत वाढ झाली असून दिवसाला हजार ते ११०० असलेली रुग्णसंख्या १५०० च्या पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे नागरीकांनीही तब्बेतीबाबत योग्य ती काळजी घ्यावी.

डॉ.प्रशांत जवादे,वैदयकीय अधीक्षक नवी मुंबई महापालिका वाशी सार्वजनिक रुग्णालय

चौकट- सततच्या हवेतील बदलामुळे रुग्णांची संख्या वाढत असून ताप ,सर्दी, खोकला याचे रुग्ण वाढले आहेत. नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

    डॉ. श्याम मोरे

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 20:31 IST
Next Story
नवी मुंबई : पाणथळ क्षेत्रावर गोल्फ कोर्स !मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप