नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान विविध योजना घोषित करतात. परंतु एकीकडे महागाई वाढतच असून शेतकऱ्यांसाठीच्या योजना फसव्या असतात. पीक विमा योजना राबवितात तर दुसरीकडे डीएपी खताच्या पोत्याच्या किमती भरमसाठ वाढवतात. त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांसाठीची पीक विमा योजना म्हणजे पंतप्रधानांची मान्यताप्राप्त मटका योजना आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष रंग राचुरे यांनी केला.

आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोकण विभागीय आप  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.  दिल्लीच्या आपच्या आमदार आतीशी सिंह, आमदार कुलदीप कुमार राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती मेनन व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. आप महाराष्ट्र ,कोकण विभागातर्फे नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ, रायगड, वांगणी इत्यादी क्षेत्रातील स्थानीय स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व क्षेत्रातील कार्यकत्यांचा  मेळावा संपन्न झाला. ह्या मेळाव्यात वरील सर्वच क्षेत्रातील सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. आप नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ध्ये विशेष उत्साह होता.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

ह्या मेळाव्यातुन आप राष्ट्रीय कार्यकारणी, तसेच महाराष्ट्र कार्यकारणीचे सदस्य ह्यांनी,आज सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या विविध जनताभिमुख विषयांवर. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ह्या मध्ध्ये, सरकारी शिक्षण आणी स्वास्थ व्यवस्था, माहिती अधिकार, सरकारी निमसरकारी उद्योगाच्या खाजगीकरणाचा चालू झालेला अतिरेक, नागरी सुरक्षा, कामगार आणी शेतकरी समस्या असे विविध विषयांवर ह्या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ह्यांच्या शिक्षण प्रणाली सल्लागार म्हणून काम करून दिल्ली मधील  मोफत सरकारी शिक्षण व्यवस्थे मध्ये क्रांतिकारक बदल घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आमदार अतीशी सिग, ह्यांनी उत्कृष्ट सरकारी शिक्षण व्यवस्था कशी असावी ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच दिल्ली आमदार कुलदीप कुमार ह्यांनी नुकत्याच दिल्ली मनपा मधील विजयाची यशोगाथा वर्णन केली. त्याच प्रमाणे सुरत मनपा निवडणुकीत आपला २७ जागांची विजयश्री मिळवून देणारे आप गुजरातचे माजी अध्यक्ष आणी नुकतेच महाराष्ट्र सहप्रभारी  आप गुजरातचे  तडफदार नेते गोपाळ इटालिया ह्यांनी सुरत विजयाची यशोगाथा ऐकवली. याशिवाय या मेळाव्याला आप महाराष्ट्र कार्यकारिणीचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला,  महादेव नाईक – महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन, धनराज वंजारी  हरिभाऊ राठोड, धनंजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.