scorecardresearch

नवी मुंबई : वीज पुरवठा पुन्हा खंडित

रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास टप्प्याटप्प्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सकाळी ११ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला.

नवी मुंबई : वीज पुरवठा पुन्हा खंडित

शुक्रवार रात्र विना विद्युत पुरवठा काढल्या नंतर शनिवारी पुन्हा रात्री आठच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर१७,१८,व १५ येथील वीज पुरवठा खंडित झाला रात्री १०:३० पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.शुक्रवार आणि शनिवार कोपरखैरणे वासीयांच्या साठी अंधार दिवस ठरला आहे. शुक्रवारी रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला ते शनिवारी दुपारी एक पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला . शनिवारी रात्री एकच्या सुमारास सेक्टर १९ सी , १७,१८,१ते४ येथील वीज पुरवठा खंडित झाला होता. वाशीत फिडर मध्ये तांत्रिक समस्या आल्याने विज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले होते .

हेही वाचा >>> नवी मुंबई : पावसामुळे कांदा भिजला,खराब झालेला कांदा रस्त्यावर..

रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास टप्प्याटप्प्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सकाळी ११ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला. मात्र पुन्हा संध्याकाळी ७ वाजता सेक्टर १५ ते १८ मध्ये विज पुरवठा खंडित झाला जो १०:३० पर्यंत सुरू झाला नव्हता . विज पुरवठा रात्री ११ वाजेपर्यंत सुरळीत होईल अशी माहिती कार्यालयातून देण्यात आली. मात्र अधिकारी वर्गाशी प्रयत्न करूनहीसंपर्क होऊ न शकल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे कारण समजू शकले नाही.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.